एकल महिलांच्या सक्षमीकरणाला कोल्हापूर जिल्हा परिषद देणार प्राधान्य: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८ हजार एकल महिलांच्या सक्षमीकरणाला आणि सशक्तीकरणाला जिल्हा परिषद सर्वोच्च प्राधान्य देईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात ‘एकल महिला धोरणा’च्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कोल्हापूर जिल्ह्याचे या धोरणांतर्गत होणारे कामकाज संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisements
  • Long-lasting perfume for all
  • Eau De Toilette
  • Unisex fragrance for daily wear, parties and travel

या कार्यशाळेच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती विद्या पाटील, अर्थ व शिक्षण सभापती सारिका नांदेकर, जि.प. सदस्या वर्षा सावर्डेकर यांच्यासह आलोक अग्रहरी आणि एस. एस. दाडे उपस्थित होते.

Advertisements

यावेळी बोलताना महिला बाल कल्याण सभापती विद्या पाटील म्हणाल्या की, एकल महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मोठी मदत होईल. कार्यशाळेच्या सुरुवातीला महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!