मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी संस्थेची५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या हॉलमध्ये संपन्न झाली .
संस्थेचे चेअरमन सत्यजीत खाडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते .
प्रथम अहवाल सालात संथेचे माजी चेअरमन कै .विनायकराव क्षीरसागर ( कोल्हापूर ), माजी संचालक कै . महादेव गोरे ( गारगोटी ), कै . पुरुषोत्तम वाचाली ( कोडोली ) , संस्थेचे संचालक लक्ष्मण पाटील यांच्या मातोश्री कै . मंजुळा पाटील ( अर्जुनवाडा ) , बेकरी विकास महासंघाचे कार्यकारी मंडळ सदस्य कै . निवासराव जाधव ( मांगूर ) तसेच संस्थेचे ज्ञात -अज्ञात सभासद , ‘ हितचिंतक आणि देशाच्या संरक्षणासाठी आहुती दिलेल्या वीर जवानानां श्रध्दाजंली वाहण्यात आली .
त्यानंतर संस्थेचे चेअरमन सत्यजीत खाडे यानीं संस्थेच्या काटकसरीच्या कामाचा धावता आढावा घेत चालू आर्थिक वर्षात ६ लाखावर निव्वळ नफा मिळवून संस्था प्रगतीपथावर वाटचाल करत आसल्याचे सांगितले. सभेवेळी पॅरिस ऑलिंपिक नेमबाजीत ब्राँझपदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
अहवाल वाचन सेक्रेटरी सौ . मानसी शिंदे यानीं केले . यावेळी सभासदानीं सर्व विषयानां एकमताने मंजुरी दिली .
सभेस व्हा . चेअरमन आब्बास गवंडी , संचालक सर्वश्री अशोक तिलगंजी, सलीम कोटलगी , संतोष बांदेकर , सागर खाडे , उत्तम माळी , नजीर पिंजारी , महादेवराव साळोखे , यशवंत हजारे, लक्ष्मण पाटील , पंडितराव माने , जयराम पिदवानी , मुनीर मिर्झाई ,दिलावर शेख , मुसा मिरशिकारी , संचालिका सौ .सरला मोरे , सौ . वर्षा बोडके ,यांच्यासह ज्यू . क्लार्क श्रीनिवास रामचंद्र गायकवाड , माजी सेक्रेटरी मोतीराम नरसिंघानी, कर्मचारीवर्ग, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार व्हा. चेअरमन आब्बास गवंडी यानी मानले.