कराड(वार्ताहर) : राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सनसनाटी आरोप करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची आज कराड मधील पत्रकार परिषदेत अक्षरशः भेंबरी उडाली. पत्रकारानीं विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देतांना त्यांना घाम फुटला . केन्द्रींय मंत्री नारायण राणे यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले. हा प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.ते प्रश्न विचारणारया पत्रकारांवरही खेकसत होते.

       ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नवा आरोप करतांना गडहिग्लज सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला. ती ब्रिक्स कंपणी त्यांच्या जावायाची आहे.त्या कंपणीत मंत्री मुश्रीफांची बेनामी संपत्ती आहे. असा आरोप  केला. मात्र या बद्दल ते ठोस बोलु शकले नाही. मोघम आणि नाटकीय भाषेत बोलत राहीले. मुबंई  पोलीसांनी बजावलेली  नोटीस बोगस होती. असे ते म्हणाले .पण पत्रकारांनी आज  कराड येथे दिलेली  नोटीसी कालचीच आहे.असे निदर्शनास आणुन दिले. तर त्याचीही उत्तरे थातुरमातुरच दिली. पण खरा घाम फुटला तो नारायण राणे यांच्यावरील आरोपांचे काय झाले या प्रश्नावर.  राणे काँग्रेसमध्ये असतांना तुम्ही असेच भ्रष्टाचाराचे आरोप केला होता. आता ते भाजपात आल्यामुळे आरोप मागे घेतला काय.?  घाम पुसत त्यांनी ठाकरे सरकारवरच टिका करीत हिन्दी मिडीया हिन्दी मिडीया. असे म्हणुन पत्रकार परीषद संपवली.

              ● जातीयवादावर विषय नेहण्याचा केवीलवाणी प्रयत्न. 

      ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापुर जिल्ह्यातील कागल मतदार संघातुन सलग पाच वेळा   निवडुन येत आहेत. तेथे  मुस्लीम मतदारांची संख्या पाच टक्के पेक्षा कमी आहे. बहुजन समाजातील लोक त्यांना प्रचंड मतांनी निवडून देतात. हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न विचारा .असे म्हटले. तर कोल्हापुरात मुश्रीफ यांच्यासाठी रस्त्यावर येणारे कार्यकर्ते हिंदुच आहेत. या प्रश्नावर तर ते भडकलेच.  हिरवा भगवा अशी  केवीलवाणी बडबड ते करीत राहीले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!