कागलचा गैबीपीर उरूस; आज नियोजन बैठक

कागल : कागल शहराचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसाच्या नियोजनासाठी सोमवार, दि. १२ रोजी सकाळी १०.३० वाजता खर्डेकर चौकातील शाहू नगर वाचनालय येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Advertisements

बैठकीला कागल शहरातील सर्व नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच तरुण मंडळांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा सविता माने, उरूस कमिटीचे अध्यक्ष तथा गावकामगार पोलीस पाटील रणजित पाटील आणि उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी केले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!