बाचणी येथे शिष्यवृत्ती सराव चाचणी शुभारंभ
व्हनाळी(सागर लोहार) : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली सराव चाचणी कागल तालुक्यामध्ये होत असल्यामुळे कागल तालुका शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात अग्रेसर ठरेल असे प्रतिपादन अन्नपूर्णा शुगर चे चेअरमन, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. विद्या मंदिर बाचणी तालुका कागल येथे शिष्यवृत्ती सराव चाचणी शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी कमळकर, सभापती मनीषा सावंत होते.
श्री घाटगे पुढे म्हणाले, शिष्यवृत्ती सराव चाचणी मुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते शिवाय भविष्यातील स्पर्धा परीक्षेची आत्तापासूनच चांगली तयारी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश सोनगेकर म्हणाले, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा शिवाय अभ्यासामध्ये त्यांचे सातत्य राहावे यासाठी आमचे वडील, माजी सैनिक कै .मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ हा स्पर्धा परीक्षेचा उपक्रम आम्ही गेली पंधरा वर्षे सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षकांना ओळखपत्राचे वितरण तसेच सावित्रीबाई दत्तक पालक योजनेतील विद्यार्थिनींना धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास आशा उबाळे, राजाराम वरुटे ,जयदीप पोवार, सरपंच इक्बाल नायकवडी ,प्रकाश सोनाळकर,बाजीराव कांबळे, सुनील पाटील, बाबासाहेबकांबळे,उत्तम पाटील, प्रकाश मगदूम ,सुकुमार पाटील, वसंत जाधव ,नेताजी कमळकर ,रवि सारंग,भिकाजी सोनाळकर आदी उपस्थित होते. स्वागत आयलू देसा यांनी केले, प्रस्ताविक भिकाजी कांबळे तर आभार एस. के. पाटील यांनी मानले.