कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर बुधवारी सकाळी ‘ ईडी ’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे.

Advertisements

आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी ‘ईडी‘छापे टाकले होते. यामध्ये काय सापडले, याची माहीती समजू शकली नाही

Advertisements

मात्र गेली वीस दिवस हे वादळ शांत झालेले नाही, याची चर्चा कागल मतदारसंघात सुरु होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेच्या शाहुपुरी मुख्यकार्यालयात पोहचले आहेत. त्यांनी तपासणी सुरु केली असून ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले आहेत.

Advertisements
AD1
One thought on “कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ईडीकडून तपासणी”
  1. […] कागल : ईडीकडून ताब्यात घेतले केडीसीसी बँकेचे अधिकारी परत आले या आधिकऱ्याचे केडीसीसी बँकेत जल्लोषी स्वागत करण्यात आले, माजी मंत्री हसन यांचे या जिल्ह्यातील कागल तहसीलमधील रहिवासी आणि पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर 11 जानेवारी रोजी छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापे टाकले होते. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!