मडिलगे (जोतिराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली, तत्पूर्वी पहाटे निपाणीहून आणलेल्या आंबेडकर ज्योतीचे स्वागत करण्यात आले. जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारा भीम उत्सव हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास रसिका तुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी डॉ. बाबासाहेब यांच्या अर्धपुतळ्याचे तसेच गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ जयश्री कुरडे, उपसरपंच सौ शुभांगी कांबळे, दिलीप कुरडे, बिद्री चे संचालक अशोक कांबळे, पंचायत समितीचे माजी सभापती बापुसो आरडे, प्रताप चव्हाण, वाघापूर हायस्कूल चे मुख्याध्यापक अशोक बरकाळे, सचिव दयानंद कांबळे, मॅनेजर संजय कांबळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सागर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत वाघापूर यांच्या वतीने कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप कुरडे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर एम जी ग्रूप यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी दूध संस्थेत अण्णासो घाटगे यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अमृत पाटील, सर्जेराव आरडे, बापूसाहेब आरडे, संजय कांबळे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते सायंकाळी भव्य मिरवणूकीसह शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये युवकांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी आयु बंतीजी नामदेव कांबळे, संदीप कांबळे, वाय पी कांबळे, नंदू कांबळे भगवान कांबळे, तानाजी कांबळे, बबन कांबळे, बाळू कांबळे, सागर कांबळे, अरुण कांबळे, प्रल्हाद कांबळे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते