केनवडे येथे अन्नपुर्णा शुगर चा दुसरा गळीत हंगाम शुभारंभ
साके(सागर लोहार):
गेल्या अनेक वर्षात कोणतीही फार मोठी राजकिय प्रबळ सत्ता, आर्थिक संपत्ती नसतानाही कठीण परिस्थीतीत कार्यकर्त्यांच्या पाठबळावर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स हा कारखाना उभा केला आहे. त्याचा आज द्वितीय गळीत हंगाम शुभारभं माझ्या हस्ते होतोय हे मी माझे भाग्यच मानतो. अशाच पद्धतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील स्वत:चा साखर कारखाना उभा केला आहे.आम्ही मात्र आयत्या पिठावर रांगोळ्या ओढत बिद्री तयार करखान्यात गेलो असेही ते पुढे म्हणाले, त्यामुळे हसन मुश्रीफ व संजय घाटगे हे शुन्यातून विश्व निर्माण करणारे दोन नेते असल्याचे प्रतिपादन बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार के.पी.पाटील यांनी केले. केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि,केनवडे च्या द्वितीय गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्नपुर्णा शुगरचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे होते. यावेळी काटा पुजन बिद्री कारखान्याचे व्हा.चेअरमन विजयसिंह मोरे यांचे हस्ते तर गव्हान पुजन मा.आमदार के.पी.पाटील यांचे हस्ते मा.आम.संजय घाटगे, अंबरिष घाटगे यांच्या उपस्थीत संपन्न झाले.
के.पी.पाटील पुढे म्हणाले, साखर निर्मितीमध्ये सर्वाधिक उत्पादन घेणा-या ब्राझीलमधील साखर कारखानदार इथेनॅाल कडे वळाल्याने तसेच तेथे दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्यामुळे साखरेला चांगली किमंत मिळेल. पर्यायाने शेतक-यांना चांगला दर मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सत्ता संपत्ती नसतानाही संजयबाबा घाटगे सारख्या नेतृत्वावर तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी अपाठ प्रेम केले. जनसामान्यातील या नेत्यांने पांढ-या पठ्यात हरीत क्रांती केली. संजय घाटगे यांनी खुप अडचणींवर मात करून हा कारखाना उभा केला आहे. मोठ्या कष्ठातून उभारलेल्या या कारखान्यास शंभर टक्के ऊस पाठवून योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
संजय घाटगे म्हणाले, कांहीनी आमचा कायमपणे द्वेश केल्यामुळे राजकारणात आम्हाला यश मिळाले नाही. हा प्रकल्प उभा करताना आनेक अडचणी आल्या.त्यातून कार्यकर्त्यांनी आमची साथ कधी सोडली नाही. कोणतीही मोठी सत्ता नसताना देखील हा प्रकल्प उभा करू शकलो ते फक्त कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच . दुस-याला द्वेश देण्यापेक्षा आपण कार्य करत राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे आम्ही दाखवून दिले आहे. शेतक-यांना परतावा देण्यासाठी प्रयत्न करणार असून सुरूवातीला इतर कारखान्यांच्या जवळपास दर देवू शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पाठवावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे, विजयंसिंह मोरे, अविनाश पाटील, विजय देवणे, धनराज घाटगे, धनाजीराव गोधडे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास ए.वाय पाटील, उपसभापती मनिषा सावंत, काकासो सावडकर, मा.सभापती आनंदी कांबळे, अशोकराव पाटील, संभाजी भोकरे, नानासो कांबळे, बाजीराव पाटील (केनवडेकर), अशोक पा.पाटील, दत्ता पाटील केनवडेकर, उत्तम वाडकर, पप्पू पोवार, सुरेश मर्दाने, के.बी.वाडकर, एम.टी.पोवार, विष्णूआण्णा गायकवाड आदी उपस्थीत होते. स्वागत अंबरिष घाटगे यांनी तर सुत्रसंचालन सुभाष पाटील यांनी केले. आभार विलास पोवार यांनी मानले.
मुश्रीफांचे योगदान…..
राजकारणातील आमचे कट्टर विरोधक असणा-या ग्रामविकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 35 वर्षाचे राजकिय विरोध बाजूला ठेवून कॅालेजमधील मैत्रीचा धागा सांभाळत कारखाना उभारणीसाठी मला मोलाचे सहकार्य केले असे गैारव उदगार संजयबाबा घाटगे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.