ताज्या घडामोडी बातमी

भातमळणीच्या सुगीला झाली सुरूवात


खळ्य़ावरील मळणी दुर्मिळ, जाग्याअभावी मळण्या रस्त्यावरचं


साके( सागर लोहार ): महापूर ,अवकाळी पाऊस यामुळे यंदाच्या भात कापणी मळणीचा सुगीचा हंगाम धोक्यात आला आहे. त्यात गेली चार दिवस पावसाने विश्रांकी घेतली आहे पण पैरापद्धतीमुळे मजूर मिळेनात, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. कमी दिवसात कापणीला आलेल्या सुधारीत भात वाणांची सध्या कापणी मळणी करण्यास शेतक-यांनी सुरूवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी घरच्याच मनुष्यबळावर भात मळणीचा बेत घातला आहे. मळणीसाठी मोकळी जागा उपलब्ध नसल्याने पारंपरिक खळ्यावरच्या मळण्या कालबाह्य झाल्यामुळे ग्रामिण भागात बहुतांशी भातमळण्या रसत्यावरच करण्याकडे शेतक-यांचा वाढता कल दिसत आहे.


भारतात उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन ऋतूमध्ये भात हे मुख्य पिक घेतले जाते. पुर्वी भात पिकांची मळणीसाठी खळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. खळ्यावर मध्यभागी एक लाकडी दांडा ठोकून त्या भोवताली बैलांना फिरवून भाताची मळणी केली जात होती. आता त्याची जागा ट्रॅक्टर व अधुनिक मळणी मशीनने घेतली असली तरी अजूनही दुर्गम भागातील शेतकरी भाताची मळणी करण्यासाठी पारंपारिक पध्दतीचा वापर करतांना दिसून येतात. जनावरांच्या शेणाने खळ्याची सारवण करून त्यावर कापणी केलेले भात पसरवले जातात. चार-पाच बैलांची दावण तयार करून त्यावरून फिरवतात. नंतर वा-या दिशेचा वेध घेऊन धान्य उपणणी केली जाते. त्यामुळे कमी खर्चात व सुरक्षित मळणी होत असली तरी शेतकऱ्यांना यामध्ये अधिक कष्ट करावे लागत होते. आता नवतंत्रज्ञान जरी विकसीत झाले असले तरी खळ्यावरील मळणीची सर ह्या रस्त्यावरील मळणीला येत नाही. परिणामी जागेचा अभाव व पावसात मजुरांची होणारी टंचाई ,दररोजचा होणारा उन पावसाचा खेळखंडोबा यामुळे बहुतांशी भातमळण्या यंदा रस्त्यावरच सूरू असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. एकविसाव्या शतकात जवळपास सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा होणारा वापर कृषी क्षेत्रातही केला जात असून आता प्रतिष्ठीत शेतकऱ्यांबरोबर सामान्य शेतकरीही आता आधुनिक कृषी तंत्रज्ञानचा वापर करू लागल्याने पारंपरिक मशागतीच्या पध्दती दुर्मिळ होत चालल्या आहेत.

भात मळणीतही अधुनिकता….
सुगीतील भातमळणीला यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.पूर्वी भातकापणी करून मोठ्या खळ्यावर कापलेले भात गोलाकार रचले जायचे. मग दोन-चार दिवसांनी पहाटे वा सायंकाळी बैल व दगडी रोळने पुरुष गडीमाणसाद्वारे मळणी काढली जात होती. कालौघात बैलांच्या संख्येत घट होऊ लागली अन्‌ ट्रॅक्‍टर अथवा मळणी मशिनद्वारे मळण्या होऊ लागल्या. त्यानंतर लाकडी खाटावरच्या झोडण्यांना बळ आले. अलीकडे खाटावरच्या मळण्या व रस्त्यावरच मळणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *