वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष करु नये तसेच स्वागतासाठी हार, तुरे आणू नयेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.