कागल : निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने गुजरातकडे जाणाऱ्या एका ट्रकच्या फास्टॅग स्कॅनिंगवरून कागल येथील आरटीओ टोल नाक्यावर मोठा वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे पर्यावसान थेट मारहाणीत झाले असून, दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी आरोप करण्यात येत आहेत.
निपाणी मोटर चालक मालक संघटनेचे सचिव सचिन जोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संघटनेचा एक ट्रक निपाणीहून गुजरातच्या दिशेने चालला होता. कागल जवळील आरटीओ टोल नाक्यावर वजनाच्या काट्यासंबंधी गाडीचे फास्टॅग स्कॅन न झाल्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी फास्टॅगमध्ये पैसे आहेत की नाही, अशी विचारणा केली. त्यावर चालकाने मोबाईलद्वारे फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम (१० ते ११ हजार रुपये) असल्याचे दाखवून दिले. तांत्रिक कारणामुळे टोल नाक्यावर ते दिसत नसावे, असे चालकाने सांगितले.

- Universal Vehicle Compatibility – Designed for all types of vehicles including cars. This FASTTAG works seamlessly acros…
- Cashless & Contactless Toll Payments – Experience smooth and secure toll payments without stopping or handling cash. RFI…
- Easy Installation & Quick Activation – Simple peel-and-stick installation on the windshield ensures proper scanning at t…
यावरून वाद सुरू असतानाच, दुसऱ्या बूथवरील एका कर्मचाऱ्याने तिथे येऊन ट्रकचालक मुबारक अब्बास रामपुरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि गचांडी धरून त्यांना मारहाण केली. त्यानंतर इतरही ४-५ कर्मचाऱ्यांनी येऊन चालकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप सचिन जोते यांनी केला आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
या घटनेनंतर निपाणी मोटर मालक संघटना आणि सर्व ट्रक मालक व चालकांनी कागल पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
“आमच्या चालकाला टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेची कागल पोलिसांनी सखोल चौकशी करावी, सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची संघटनेतर्फे मागणी आहे.”
— सचिन जोते, सचिव, निपाणी मोटर मालक संघटना
कागल पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत पुढील कारवाई करत आहेत.