आयटीआय मध्ये 9 ऑक्टोबरला रोजगार मेळावा

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये पीएम नॅशनल ॲप्रेन्टीशिप मेला (PM National Apprenticeship Mela) (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनाक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला असल्याची माहिती, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रांचे अंशकालीन प्राचार्य एम. एस. आवटे यांनी दिली आहे.

Advertisements

या मेळाव्यांस जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील किमान ५० नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच इतर पदवी व पदविकाधारक, दहावी पास, दहावी नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व आधारकार्ड घेवून मेळाव्यांस उपस्थित रहावे. असे आवाहन श्री. आवटे यांनी केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!