सर्व दुग्ध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण अनिवार्य

कोल्हापूर, दि. 15 : जिल्ह्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे वर्ग-3 इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दुध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण वापरण्याबाबत 1 जानेवारी 2023 पूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक रा.ना.गायकवाड यांनी दिले आहेत.

Advertisements

नियंत्रक वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दूध खरेदी- विक्री मधील गैरप्रकार रोखणे व ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर करणाऱ्या दुग्ध संकलन केंद्रावर दुध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे (E-Value- 10g) वर्ग-3 (Accuracy Class-III) इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, 2011 चे नियम 23 अन्वये कारवाई करण्यात येईल. हे आदेश 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील, असेही श्री. गायकवाड यांनी कळविले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!