जिल्हा लोकशाही दिनी आठ अर्ज प्राप्त

कोल्हापूर : जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रमात आठ अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, तहसीलदार रंजना बिचकर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Advertisements

             आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात महसूल विभाग 2, पोलीस विभाग 1, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 4  व जिल्हा परिषद कार्यालय 1 असे एकूण  8 अर्ज प्राप्त झाले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!