शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांचा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे सत्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांचा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या वतीने आज भव्य स्वागतपर सत्कार करण्यात आला.

Advertisements

सत्कारादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शिक्षण विभागाकडून आवश्यक सहकार्य, मार्गदर्शन व सकारात्मक समन्वय लाभावा, यावर सविस्तर चर्चा झाली. शाळांच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींमध्ये परस्पर सहकार्याने काम करण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला. येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षणाची गुणवत्ता, दर्जा आणि प्रतिष्ठा अधिक व्यापक करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन एकमेकांना पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Advertisements

या प्रसंगी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष गणेश नायकुडे, संस्थापक अध्यक्ष महेश पोळ, जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील, उपाध्यक्ष संजय जाधव, माजी उपाध्यक्ष नझरूदीन काझी, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, खजिनदार माणिक पाटील, क्रीडा विभाग प्रमुख सचिन नाईक, राधानगरी व भुदरगड तालुकाप्रमुख प्रकाश डेळेकर, कोल्हापूर शहर प्रमुख  अमर सरनाईक, शिरोळ तालुकाध्यक्ष सुहेल बाणदार तसेच वर्किंग कमिटीचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते.

शिक्षण विभाग आणि इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक व रचनात्मक पद्धतीने कार्य करण्याचा निर्धार शेवटी व्यक्त करण्यात आला.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!