‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानांतर्गत

२५ ऑगस्टला शिबीराचे आयोजन

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

Advertisements

या अभियानाचा लाभ देण्यासाठी शुक्रवार दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी महासैनिक दरबार सभागृह, लाईन बाजार रोड, कसबा बावडा येथे सकाळी ११ वाजता शिबीर आयोजित करण्यात आले असून सकाळी १० वाजता दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली आहे.

Advertisements

या अभियानासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चु कडू, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबीटकर तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या अभियानास उपस्थित राहणार आहेत. या शिबीरात दिव्यांग व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!