साके ते आदमापूर पायीदिंडी सोहळा

साके : सागर लोहार साके ता.कागल येथील हरिपाठ भजनी मंडळ आणि गावातील बाळु मामा भक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण महिन्यातील पहिला रविवार सकाळी ८ वाजता साके ते श्री क्षेत्र अदमापुर बाळु मामा पायी दिंडी सोहळा संपन्न झाला.

Advertisements

मोठ्या संख्येने बाळु मामा भक्त ह्या दिंडी मध्ये सहभागी झाले होते.एकूण २१७ भाविक होते तर महिलांचा सहभाग अधिक प्रमाणात होता.वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहात दिंडी मध्ये रमला होता.

Advertisements

महिलांनी बाळु मामांची बोली गाणी आणि ओव्या गात बाळु मामाच्या नावानं चांगभलं करत ऊन वारा पाऊस याचा विचार न करता हा पायी दिंडी सोहळा आनंदात पुर्ण केला.तर दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शहाजी सखाराम पाटील,राजाराम आनंदा पाटील,राजु सातुसे,अशोक ससे,विश्वास पाटील,विनायक सातुसे यांनी परिश्रम घेतले.

Advertisements

यावेळी बाळु तु.पाटील,संतोष गवसे,साताप्पा आगलावे,संदिप खराडे,बाळु पोवार,सुधाकर पोवार यांनी अभंग आणि भजन तर समाधान कोराणे यांनी मृदंग सेवा केली.पायी दिंडीमध्ये ग्रामस्थ वारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!