बाचणी परिसरातील शेतक-यांचे समरजितसिंह घाटगे यांना निवेदन
व्हनाळी : सलग तीन वर्षे बॅंकेकडून घेतलेले पीक कर्ज नियमीत परतफेड केले असताना सुद्धा साके,व्हनाळी,केंबळी,बेलवळे, ता.कागल परिसरातील सुमारे 400 एवढ्या शेतक-यांना बॅंक आॅफ इंडिया च्या बाचणी शाखेतून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर 50 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.
या शेतक-यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेवर केली पण थोडीशी कांही वेळा दिरंगाई झाली त्याचा फटका या शेतक-यांना बसला असून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच्या मागणीचे लेखी निवेदन भाजपाचे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या जनता दरबारात हजर राहून पंचक्रोशीतील शेत-यांनी दिले आहे.
निवेदनाद्वारे आपली कैफीयत मांडताना शेतक-यांनी असे म्हंटले आहे की, आम्ही 400 च्या दरम्यान एवढे शेतकरी असून बॅांक अॅाफ इंडिया च्या बाचणी शाखेतून दरवर्षी आम्ही पीक कर्जे घेतो. त्याची परतफेड नियमीत केलेली आहे. परंतू कोरानाच्या महामारीमुळे पीक कर्ज भरणेस फक्त कांही दिवसांची दिरंगाई झाली आहे. या झालेल्या दिरंगाईचा फटका आम्हाला बसला असून प्रोत्साहानपर अनुदान कर्जमुक्ती योजनेमध्ये आमची नावे आलेली नाहीत.
याबाबत आम्ही बॅंकेकडे विचारणा केली असता त्यांनी तुम्ही नियमित परतफेड केलेली असली तरी दोन वर्षाच्या परतफेडीच्या दिरंगाईमुळे तुमचे नाव या प्रोत्साहानपर यादीत अलेले नाही असे सांगितले जाते.
या सर्व बाबी ऐकुन घेतल्यानंतर भाजपाचे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले,तुम्हा शेतक-यांच्या या अडचणी भावणा मी सहकार मंत्र्यांपर्यंत पोहचवून तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थीत शेतक-यांना दिले.
निवेदनावर सुभाष शेंडे, दिग्वीजय पाटील, तानाजी पाटील, रणजित पाटील, तानाजी बंडा पाटील, बाजीराव पाटील, शिवाजी गवसे यांच्या सह्या आहेत यावेळी चंद्रकांत पाटील, राजाराम गवसे, अनिल घराळ, अशोक पाटील, बाजीराव शेंडे, शारदा चौगले, कल्पना बिडे आदी शेतकरी उपस्थीत होते.