दादासो लवटे यांची भारतीय कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड !

मुरगूडच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुरगूड (शशी दरेकर) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगूड संकुलाचे आंतरराष्ट्रीय NIS कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांची २५ ते ३० जून २०२६ दरम्यान पटाया (थायलंड) येथे होणाऱ्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisements

   महाराष्ट्रातील मुलींच्या कुस्तीला आयाम  देण्यासाठी लवटे यांनी घेतलेल्या अविरत कष्टांचे आणि समर्पणाचे हे फळ आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) त्यांच्या या कौशल्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला आहे.

Advertisements

आत्तापर्यंत भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून
१. जूनियर २० वर्षाखालील  आशियाई कुस्ती स्पर्धा बँकॉक-२०२४
२. १५ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा कीरगिस्थान-२०२५
या दोन्ही स्पर्धेमध्ये भारतीय कुस्ती संघाला सांघिक विजेतेपद मिळवून देण्याचे काम केल्यामुळे
३. १५ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा थायलंड २०२६ साठी निवड केली आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल संकुलाचे प्रमुख माजी खासदार संजय दादा मंडलिक,कार्याध्यक्ष ॲड.विरेंद्र भैय्या मंडलिक,भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंग, सेक्रेटरी विनोद तोमर,मेहरबान सर, महाराष्ट्र कुस्ती संघ सेक्रेटरी योगेश दोडके,कार्याध्यक्ष संदीप भोंडवे,
राज्य उत्पादन शुल्क सह आयुक्त सुनील चव्हाण साहेब,SAI समन्वयक सी.बी.चव्हाण सर आणि डॉ.प्रशांत अथणी यांनी सरांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!