कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर आठवड्याला ब्लॅक ऑस्ट्रॅलार्प जातीचे एक दिवशीय पिल्ले विक्री केली जाते. या एक दिवशीय पिल्लांची किंमत रुपये 20 प्रति नग असून 100 पिल्लांसाठीच्या चिकबॉक्सची किंमत रक्कम रुपये 50 आहे.
तसेच उबवणुकीची अंडी उपलब्ध असून त्याचा दर रक्कम रुपये 11 प्रति नग प्रमाणे आहे. तरी अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. प्रविण नाईक यांनी केले आहे.