कोल्हापूर : संविधानिक मूल्यांच्या परीघ विस्तारातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची भक्कम उभारणी शक्य आहे. असा सूर शनिवारी शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘जगण्यातलं संविधान’ या विशेष परिसंवादात उमटला.
संविधान दिनानिमित्त राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने ‘जगण्यातलं संविधान ‘हा राज्यस्तरीय परिसंवाद विद्यापीठाच्या राजर्षी शाहूसभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, स्तंभलेखक सॅबी परेरा, प्रा. राहुल सरवटे, कीर्तनकार सचिन पवार, डॉ. गायत्री लेले सहभागी झाल्या.