जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न

कोल्हापूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

जिल्ह्यात शासकीय, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठामध्ये 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!