हुपरी (शिवाजी फडतारे) : स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत दि. ०१ ऑक्टो.२०२३ रोजी एक तारीख- एक तास उपक्रमा अंतर्गत आज हुपरी नगरपरिषद हुपरी च्या वतिने स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला.
शासनाच्या वतीने 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर हा कालावधी स्वछता पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. स्वछता हिच सेवा या अभियान अंतर्गत एक दिवस एक तास हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात एकाच वेळी एक तास स्वच्छता करणेचे दिलेल्या सुचनेप्रमाणे हुपरी नगरपरिषद च्या वतीने शहरात सर्व प्रभागात स्वच्छता करण्यात आली.
शहरतील सर्व शाळांचे विद्यार्थी, हुपरी पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, यांचे सहकार्यातून आज नगरपरिषद हुपरी चे सर्व अधिकारी व मुख्याधिकारी यांनी नेहरू चौक, बाजार पेठ, 180 फुट बायपास रोड, श्री अंबाबाई मंदिर परिसर, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, पोलीस स्टेशन परिसर, अमृत रोपवाटिका होळकर नगर आदी परिसर स्वच्छ केला.
सुमारे दोन तास श्रमदान करून पोलीस स्टेशन, नगरपरिषद , व सर्व शाळांनी परिसर स्वच्छता केली, या कामी मा मुख्याधिकारी श्री अशोक कुंभार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व मा प्रसाद पाटील आरोग्य अभियंता, मा क्षितिज देसाई प्रशासकीय अधिकारी यांचे नियोजना नुसार कार्यवाही करण्यात आली,
या अभियानात दोन ट्रॅक्टर ट्रॉली, एक जेसीबी सह कर निरीक्षक डॉ ज्योती पाटील, लेखापाल श्री रोहित कनवाडे, नगर अभियंता प्रदीप देसाई, मिळकत पर्यवेक्षक श्रद्धा गायकवाड, रामचंद्र मुधाळे, मिरासो शिंगे, विनोद कांबळे, उदय कांबळे, प्रणव चव्हाण, शुभम वाघेला, रमेश गुरव, सूर्यकांत कुंभार आदी कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या अभियानात सुमारे 7 टन कचरा संकलित करण्यात आला.