मुरगूड येथील युथ सर्कल तर्फे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल युथ सर्कल मंडळ पाटील गल्ली यांच्यावतीने गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अभिनेत्री अस्मिता खटावकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाखाली सदरच्या स्पर्धा होणार आहेत. खेळ पैठणीचा होम मिनिस्टर स्पर्धा जिंकणाऱ्या महिलांसाठी प्रथम क्रमांक पैठणी व चषक तर दुसरा क्रमांक … Read more

गोरंबे गावात गणेशोत्सव २०२५ ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा होणार

कागल : कागल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोरंबे गावामध्ये यंदाचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस आणि कगळ पोलीस ठाणे यांनी गोरंबे गावाचे विशेष अभिनंदन केले आहे. गेल्या वर्षी गावात डॉल्बी लावल्याबद्दल १५ गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी खटले दाखल करण्यात आले होते. याची दखल … Read more

मुरगूडच्या राजर्षि शाहू पत संस्थेची ५० वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत

१५० कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा व्यवस्थापकीय मंडळाचा संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) : खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी स्थापन केलेली आणि सद्या माजी खासदार संजयदादा मंडालिक व युवानेते ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली उतूंग आर्थिक भरारी घेत असलेली शहरातील सुवर्ण महोत्सवी राजर्षि शाहू नागरी सहकारी पत संस्थेची ५० वी वार्षिक सर्व … Read more

कागलचे संजय भुरले उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित

कागल / प्रतिनिधी : कागल तलाठी कार्यालयात काम करणारे संजय भुरले यांना उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित करण्यात आले .कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी केलेल्या सन 2024 ते 2025 या वर्षात उत्कृष्ट कामासाठीचा हा गौरव आहे.              संजय भुरले हे महसूल सेवक म्हणून कागलच्या तलाठी कार्यालयात काम करतात. महसूल … Read more

सुगंधा हाळजाळे-कोरे यांचे निधन

कागल /प्रतिनिधी :कसबा सांगाव, तालुका- कागल येथील श्रीमती सुगंधा हळजाळे यांचे  वार्धक्याने निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय 104 वर्षाचे होते. उकॄष्ट कब्बड्डी कोच व नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष एन डी कोरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले व मुलगी,सुना नातवंडे,जावई असा परिवार आहे.

जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभागाकडून जलव्यवस्थापनातील नवा एसओपी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि कृषिप्रधान कोल्हापूर जिल्हा, नेहमीच नैसर्गिक आपत्तींना, विशेषतः पुराला, तोंड देत आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात, पंचगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांना पुराचा धोका निर्माण होतो. परंतु, या वर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पूर्वनियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व संबंधित विभागांमध्ये उत्कृष्ट समन्वय साधून पूरस्थिती प्रभावीपणे टाळली. या … Read more

सिंगल युज प्लॅस्टिकला पूर्णपणे ‘टाटा बाय बाय’, शासकीय कार्यालयांमध्येही प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी!

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘100 दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ अभियानाचा शुभारंभ कोल्हापूर: पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या टाळा, असे महत्त्वपूर्ण निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘100 दिवसांत प्लॅस्टिक दूर.. नक्की … Read more

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीस ठाण्याकडून रुट मार्च

मुरगूड ( शशी दरेकर ): आगामी गणेशोत्सव व ईद – ए – मिलाद उत्सवाच्या अनुषंगाने मुरगूड पोलीस ठाण्याने मुरगूडसह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातून रुट मार्च काढला. यावेळी एसटी स्टँड मुरगुड परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली .सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड ,मुरगूड नाका- मुख्य बाजारपेठ ,कबरस्थान … Read more

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून रूट मार्च

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ‌) : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद (ईद-ए-मिलादुन-नबी) सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव, कंदलगाव, उजळाईवाडी आणि कणेरी या गावांमध्ये रूट मार्च काढला. हा रूट मार्च दिनांक २२/०८/२०२५ रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडला. या रूट मार्चचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना … Read more

कर्नाटकच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत कागलचा अभय बोते कास्यपदक विजेता

कागल / प्रतिनिधी: येथील अभय बोते यांनी आर्मेचर बॉडी बिल्डर अँड फिजिक स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाने बेंगळुरू कर्नाटक येथे राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तिसरे स्थान मिळवत कांस्य पदक पटकावले. ४० ते ५० वयोगटातील मास्टर कॅटेगरी ग्रुप १ मध्ये त्यांनी यश मिळवले आहे. भारत मास्टर प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत या वयोगटात मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग … Read more

error: Content is protected !!