वादळी पावसामुळे सिद्धनेर्ली परिसरात मोठया प्रमाणात नुकसान

सिद्धनेर्ली (श्रध्दा सुर्वे ) : गेली दोन दिवसांच्या उष्णते नंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने सुमारे अर्धा तास सिद्धनेर्ली परिसराला चांगलेच झोडपून काढले. यामुळे सिद्धनेर्ली परिसरातील अनेक जणांचे नुकसान झाले.अनेक ठिकाणी घराची कवले, पत्रे उडून गेली असून शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी देखील या वादळी पावसात उडून जाऊन नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे ग्रामस्थांची चांगलीच दैना झाली, … Read more

Advertisements

समाजासाठी झटणाऱ्या लोकांचा गौरव व्हावा – संजयबाबा घाटगे

बाचणी येथे विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ व्हनाळी – वार्ताहर :समाजपयोगी माणसे ही त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे नावारूपास आलेली असतात. त्यांच्यामुळेच समाजामध्ये कांहीतरी चांगले घडत असते. समाजाने ही अशी माणसे हेरून त्यांच्या व्यक्तीमत्वांच्या उंचीएवढा गौरव करायला हवा. असे प्रतिपादन अन्नपूर्णा शुगरचे अध्यक्ष, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. बाचणी (ता. कागल) येथे सरवडेच्या किसनराव मोरे प्रशालेचे आदर्श शिक्षक … Read more

अहिल्यादेवी होळकर राष्ट्रवीरांगना – युवा लेखक साथी उमेश सूर्यवंशी

कागल(विक्रांत कोरे): अहिल्यादेवी होळकर या राष्ट्राच्या नायिका आहेत. त्यांचे कार्य क्रांतिकारक आहे. त्यांना धार्मिकतेत न ठेवता त्यांचे कार्य व त्यांचा खरा इतिहास देशभर पसरवला पाहिजे, असे प्रतिपादन युवा लेखक व इतिहास अभ्यासक साथी उमेश सूर्यवंशी यांनी केले. करनूर ता. कागल येथे बिरदेव तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या … Read more

साके स्मशनशेडची दुरावस्था, बांधकामही अर्धवट पावसाळ्यापुर्वी छप्पर दुरूस्ती करावी ग्रामस्थांची मागणी

व्हनाळी(सागर लोहार) : साके ता. कागल येथील असणा-या स्मशनशेड (वैकुंठभूमी) दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आसून आद्याप संबधीत ग्रामपंचायतीने दुरूस्ती केलेली नाही. शासनाच्यावतीने दर वर्षी स्मशानशेड दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होत असून देखील गेल्या वर्षेभरात सदर स्मशानशेडची दुरूस्ती केलेली नाही. शेडचे पत्रे पुर्णपणे खराब झाल्याने पावसाळ्यात मृतांवर अंत्यसंस्कार कराचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. संबधीत ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपुर्वक … Read more

कुरणी येथे महाराष्ट्र अंनिसचे ‘विधवा अवमान प्रथा’ विरोधात लोक जागर अभियान संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : विधवा महिलांचे मानसिक खच्चीकरण म्हणजे संपूर्ण भारतीय महिला समूहाचे मानसिक खच्चीकरण आहे. देशातील पन्नास टक्के महिलांना प्रवाहातून वंचित ठेवल्यामुळे अर्धा देश अधोगतीत लोटणे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श घेऊन केंद्र शासनाने “विधवा अवमान प्रथा बंदी”चे विधेयक संमत करावे व हा कायदा संपूर्ण देशासाठी लागू करावा अशी मागणी शाश्वत विकास चळवळ या संस्थेचे प्रणेते … Read more

गाड्यावरील फळविक्रेता ते सनदी अधिकारी

सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेचे यूपीएससी (UPSC ) परीक्षेत यश सिद्धनेर्ली (श्रध्दा सुर्वे-पाटील) – ता. कागल जि. कोल्हापुरचे सुपुत्र स्वप्निल तुकाराम माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा UPSC परीक्षेत देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे. सोमवारी दुपारीच जाहीर झालेल्या या निकालात अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांने हे यश मिळवले आहे. स्वप्निल याचं … Read more

सुख, समाधान आणि मन: शांती या मुल्यांच्या आधारे पत्रकारीता केली पाहिजे : ब्रम्हाकुमार कोमल भाई

हुपरी येथे ब्रम्हाकुमारी सेवाकेंद्रांतर्गत मिडीया संमेलन व्हनाळी(सागर लोहार) : पत्रकारीता ही एक समाजसेवा आहे काळानुसार बदलती आव्हाने व वास्तव यांचे भान ठेवून कोणाशीही द्वेश मत्सर न बाळगता पत्रकाराने सुख, समाधान आणि मन: शांती या मुल्याच्या आधारे पत्रकारीता करून समाजात शांतीचा संदेश दिला पाहिजे. समाजात कांहीतरी चांगले करण्यासाठीच भगवंताने आपल्याला पत्रकार होण्याची संधी दिली आहे. लोकशाहीचा … Read more

मुरगुडमध्ये सहा जून रोजी होणार शिवराज्याभिषेक सोहळा

अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने होणार पुष्पवृष्टी ; विविध कार्यक्रमाचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जूनला राज्याभिषेकदिनी मुरगूड मध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याभिषेक दिनांचे औचित्य साधून येथे नव्यानेच लोकार्पण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवप्रेमीनी … Read more

शिवसेनेचे विचार घराघरात पोहचवा : स्वप्नील महाडिक

कागल-गडहिंग्लज-उत्तुर विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क अभियान दौरा व्हनाळी (सागर लोहार) : कोल्हापूर जिल्हा हा महत्त्वाचा असून तालुक्यातील कुठलेही प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे,आज शिवसेनेचा एक आमदार येथे असला तरी भविष्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून येण्यासाठी शिवसेना पक्ष भक्कम करून शिवसेनेचे विचार घराघरात युवकांच्या मनामनात पोहचवा असे … Read more

राज्यात राजर्षी शाहू विचारांचा प्रसारासाठी जणजागरण यात्रा होणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर, दि. 29 : शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारांनी नेहमीच प्रेरणा दिली. लोकराजा शाहुंचे प्रेरणादायी विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रात जनजागरण यात्रा होणार असल्याची माहिती गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षी शाहू विचार संमेलन दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आले होते, यावेळी … Read more

error: Content is protected !!