पाच लाखाचा गुटखा कागल पोलिसांनी पकडला

कागल(विक्रांत कोरे): आर एम डी, विमल नामांकित गुटखा व दोन कार असा सुमारे पाच लाख 21 हजार 484 चा गुटखा कागल पोलिसांनी पकडला. दोन आरोपींना अटक केली आहे. कागल न्यायालय कडे जाणाऱ्या बोगद्याजवळ सर्विस रोडवर सकाळी साडेअकरा वाजता ही कारवाई कागल पोलिसांनी केली. आश्रम हाजी दाऊद मेनन वय वर्षे 42 राहणार फातिमा अपार्टमेंट, मच्छी मार्केट … Read more

Advertisements

वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी निस्वार्थी झटणारे जेष्ठ संपादक नेते : आप्पासाहेब पाटील

सांगलीचे ज्येष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर ज्या कामात ते हात घालतात अथवा जे काम हाती घेतात ते तडीस नेण्यासाठी तन,मन,धनासह अपार कष्ट व अभ्यास करीत असतात. यामुळे आप्पासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्व सर्वांना हवेहवेसे वाटते. ज्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल, त्या क्षेत्रातील … Read more

ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुनच स्वयंसेवी संस्थांनी झेंडे वितरीत करावेत-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करुनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा … Read more

मुरगूड पोलिसानी बसस्थानक, कॉलेज परिसरातील टवाळखोराना दाखविला कायद्याचा धाक

अनेक वाहनावर केली कारवाई मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बसस्थानक व कॉलेज परिसरात टिंगल- टवाळी करीत फिरणाऱ्या तरुणानां मुरगूड पोलिसानीं कायद्याचा धाक दाखविलयाने तरुणांच्यामध्ये चांगलीच धडकी बसली आहे. याबरोबरच विद्यार्थी -विद्यार्थिनीनां कायद्याचे प्रबोधन केले. शाळा, महाविद्यालय वेळेत बसस्थानक परिसर विद्यार्थी -विद्यार्थिनीनीं गजबजून जातो. शुक्रवारी अचानक मुरगूड पोलिसानीं हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणानां आपला … Read more

केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव – आमदार हसन मुश्रीफ

जिल्हा बँकेत साधला पत्रकारांशी संवाद कोल्हापूर, दि. ४: राज्यात सत्तांतर झाले आहे. परंतु, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर इलेट्रॉनिक … Read more

ऑगस्ट महिना हा सणवार, उत्सवाने भरलेला; यंदा २२ शुभ

सण-उत्सवाच्या श्रावणात यंदा २२ शुभ, उत्तम दिवसांचा योग सणासुदीचे दिवस – ऑगस्टमध्ये वास्तुशांतीसाठी सहा दिवसच मुहूर्त व्हनाळी(सागर लोहार) : भारतीय संस्कृतीमध्ये घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मंगल कार्य करावयाचे असल्यास शुभ तिथी पाहिली जाते. नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात नागपचंमी, पुत्रदा एकादशी, मोहरम, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपालकालासह अशा अनेक सणांची पर्वणी … Read more

प्रसाद पाटील यांच्या वाढदिवासानिमित्य पुस्तके भेट कार्यक्रम उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : पुरोगामी वाचन चळवळ कोल्हापूर यांच्या वतीने साहित्यीक मा .जी. के . पाटील तथा गोविंद पाटील ( सर ) यांच्या संयोजनातून पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याअध्यक्ष प्रसाद पाटील ( सर ) यांच्या वाढदिवसानिमित्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोनवडे येथिल ” अभिनव करियर अॅकेडमीमध्ये पुस्तके भेट कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख … Read more

मुरगूड पोलिसांकडून बोरवडे येथील चोरीचा छडा मुद्देमाल हस्तगत चोरटे जेरबंद करण्यात मुरगूड पोलिसांना यश !

मुरगूड (शशी दरेकर) : बोरवडे’ ( ता. कागल ) येथे १८ जुलै २०२२ रोजी आनंदा गोपाळ जाधव यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा मुरगूड पोलीसांनी लावून सोन्याचे दागिने व रोकड असा ९० हजार चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघा चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसानां यशआले आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेली आधिक माहिती अशी : बोरवडे येथील आनंदा … Read more

एन.डी.गोंधळी यांना “आदर्श अधिकारी पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील दुय्यम निबंधक श्रेणी,१ कार्यालयाचे दुय्यम निबंधक एन.डी. गोंधळी यांना महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल व वन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘आदर्श अधिकारी पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले. राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्व असून ते लक्षात घेवून १ ऑगस्ट या महसूल दिनी कायदा व सुव्यवस्था,नैसर्गिक … Read more

ब्लॅक ॲस्ट्रोलार्प जातीच्या पिल्लांसाठी संपर्क करा

कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर आठवड्याला ब्लॅक ऑस्ट्रॅलार्प जातीचे एक दिवशीय पिल्ले विक्री केली जाते. या एक दिवशीय पिल्लांची किंमत रुपये 20 प्रति नग असून 100 पिल्लांसाठीच्या चिकबॉक्सची किंमत रक्कम रुपये 50 आहे. तसेच उबवणुकीची अंडी उपलब्ध असून त्याचा दर रक्कम रुपये 11 प्रति नग प्रमाणे आहे. तरी अधिक माहितीसाठी … Read more

error: Content is protected !!