प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पुर्ली अंतर्गत परिते गावात हरिनाम सप्ताहामध्ये अन्नविषबाधा

जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र इस्फुर्ली, ता करवीर अंतर्गत परिते गावामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान हरिनाम सप्ताहामध्ये एकूण १५० लोक सहभागी झाले होते. सप्ताहानंतर लोकांना जेवण देण्यात आले होते. त्यामध्ये भात, आमटी, कुर्मा व गुलकंद खीर देण्यात आली होती. सदरचे जेवण स्थानिक आचाऱ्यांमार्फत … Read more

कागलला १३ पासून राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कागल : कागल नगरपरिषदेच्यावतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन १३ ते १८ जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे २१ वे वर्ष आहे. रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत केले. शनिवारी (ता.१३) पहिले पुष्प रविकिरण पराडकर (निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई) यांचे ‘वर्दीतील विनोद आणि कविता’, रविवारी … Read more

कागल नगरपालिकेचा ११५ वा वर्धापन दिन

कागल : कागल नगरपरिषदेचा ११५ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त पालिकेत ध्वजवंदन सोहळा पार पडला. कागलचे अधिपती आणि नगरपरिषदेचे संस्थापक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पालिकेचे कर्मचारी आणि सर पिराजीराव घाटगे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पालिकेत श्री … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या नावाने उघडले बनावट फेसबुक अकाउंट

कागल पोलिसात गुन्हा कागल (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अज्ञाताकडून बनावट फेसबुक खाते काढण्यात आल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात देण्यात आली. अज्ञाता विरुद्ध पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद मंत्री मुश्रीफ यांचे फेसबुक खाते चालविणारे सुशांत बाळासाहेब डोंगळे (रा. शेंदूर ता कागल जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे. सुशांत डोंगळे यांनी दिलेल्या … Read more

विकास सावंत यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : विकास सावंत एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही सामाजिक कार्याची आवड व फुले, शाहू, आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचार घेऊन जगणाऱ्या विकास सावंत यांच्या जयंतीनिमित्त विद्या मंदिर निढोरी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बी.एल.मोरबाळे होते . विद्या मंदिर निढोरीचे मुख्याध्यापक … Read more

मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे नाहीतर तिव्र आंदोलन करु – मा. उपनगराध्यक्ष दगडू शेणवी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे वकिलांनी विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी कागल तालुका युवाअध्यक्ष दगडू शेणवी दिला. ते म्हणाले कागल तालुक्यातील 85 गावांपैकी 58 गावे भौगोलिक दृष्ट्या मुरगुड शहरांशी मध्यवर्ती ठिकाण म्हणून संलग्न आहेत. पक्षकारांना कागलला जाण्या येण्या च्या गैरसोयी होत … Read more

प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानाने दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 19 चालकांवर मोटर वाहन कायदा व नियम अंतर्गत कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. प्रादेशिक परिवहन विभागाची सहा पथके यामध्ये सहभागी झाली होती. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर व जयसिंगपूर येथे या पथकांमार्फत एकाच वेळी … Read more

मुरगूडमध्ये रविवारी विकसित भारत संकल्प यात्राचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना नागरीकांपर्यंत पोहचाव्या व योजनांची जागरूकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरीकांना या योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहिम राबविण्यात येणार असून या अनुशंगाने मुरगूड शहरातील सर्व नागरीकांनी या योजनांचा लाभ देण्याच्या हेतूने रविवार … Read more

सावर्डे येथे ३ जानेवारी रोजी साई भंडारा

विविध कार्यक्रमांचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे ( ता. कागल ) येथील श्री . साईबाबा मंदीराचा २१ वा वर्धापनदिनानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी २०२४ रोजी साईभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. साई भंडाऱ्यानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजता श्रीं चा अभिषेक व महापूजा, … Read more

देशातील पहिला मध महोत्सव महाराष्ट्रात मुंबईत 18 व 19 जानेवारी रोजी आयोजन

मुंबई, दि. 27 : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.  फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य … Read more

error: Content is protected !!