महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न : तज्ञ समितीच्या बैठकीतून पुढचा प्रवास

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा केवळ भूभागाशी संबंधित वाद नाही, तर तो थेट सीमा भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. शिक्षण, शासकीय सुविधा, शिष्यवृत्ती ते अनुदान यांसारख्या प्रश्नांमध्ये या भागातील लोकसंख्येला कायमस्वरूपी संघर्ष करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात नुकतीच झालेली तज्ञ समितीची बैठक महत्त्वाची ठरली आहे. नियमित बैठकांचा निर्णय : सातत्याचा दृष्टीकोन समितीच्या बैठकीत … Read more

Advertisements

कागल पंचायत समिती मध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान कार्यशाळा संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : येथील पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा बहुउद्देशीय हॉल येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे हे होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती व लोकसहभागातून त्या योजना कशा पूर्ण कराव्यात याचे मार्गदर्शन गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी करत, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी या … Read more

आदमापूरचे बाळूमामा मंदीर १३/९ ते १६/९/२०२५ पर्यंत बंद राहणार

मुरगूड ( शशी दरेकर ) – सालाबाद प्रमाणे सद् गुरु श्री. बाळूमामा देवालय आदमापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथिल शारदीय उत्सव साजरा करणेत येत आहे. त्या अनुषंगाने न्यासाचे मंदीर , भक्तनिवास , अन्नछत्र व परिसराची स्वच्छता करण्याकरिता दि. १३/९ /२०२५ ते १६/९/२०२५ पर्यंत  न्यासाचे भक्तनिवास बंद राहणार आहे . तरी भाविक- भक्तानी याची नोंद घेऊन … Read more

हर्षदा खापणे हिचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुहेरी यश

श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर ची विद्यार्थिनी हर्षदा आनंदा खापणे हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुहेरी यश प्राप्त केले. जय हनुमान हायस्कूल इस्पुर्ली येथे प्रथम क्रमांक तर वि. स. खांडेकर प्रशाला कोल्हापूर येथे द्वितीय क्रमांक पटकावला. तिने व्यसन सोशल मीडियाचे पालटले चित्र समाजाचे व वाचन संस्कृती काळाची गरज या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. तिच्या … Read more

हरित महाराष्ट्रासाठी जबाबदारीची पावले

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेले 43 लाख 45 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रथमदर्शनी मोठे वाटेल, परंतु राज्याच्या ‘दहा कोटी वृक्ष लागवड अभियाना’त हे केवळ एक छोटे योगदान आहे. आत्तापर्यंत 12 लाख 60 हजार वृक्ष लागवड झाली असली तरी उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्या यंत्रणेला झटावे लागणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेला सप्टेंबरअखेरपर्यंतचा आदेश म्हणजे फक्त … Read more

जय गणेश तरुण मंडळाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील कापशी रोडवरील जय गणेश तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ७० रुग्णांची जनरल तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन बिद्री साखरचे संचालक प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , बिद्री साखर चे माजी … Read more

निढोरीत ‘ओम साई’ च्या मोदक सजावट स्पर्धेत तनुजा, दुर्गेशा, माधूरी ठरल्या विजेत्या

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील ओम- साई कला, क्रीडा, सांस्कृतिक युवा मंच प्रणित सुवर्ण गणेश मंदिर (गोल्डन टेम्पल )मार्फत घेण्यात आलेल्या अनोख्या मोदक बनवण्याच्या स्पर्धेत सौ. तनुजा विनायक सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. दुर्गेशा विशाल पाटील आणि तृतीय क्रमांक सौ. माधुरी अमित सुतार यांना मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिसाच्या … Read more

निधन वार्ता- मथुरा तुकाराम पार्टे

कुरणी ता. कागल येथिल मथुरा तुकाराम पार्टे ( वय ७२ ) यांचे अल्पशा आजाराने दि .६ / ९ / २०२५ रोजी दुःखद निधन झाले. कुरणी येथिल प्रतिष्ठित व्यापारी उत्तम पार्टे व प्रगतशील शेतकरी मच्छींद्र पार्टे यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या निधनाने कुरणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा … Read more

कागलमध्ये ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत सर्व रोग व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन

कागल (सलीम शेख) : ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, कागल आणि वीर जवान मित्र मंडळ, कागल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ सप्टेंबर, २०२५ रोजी एक भव्य सर्व रोग निदान आणि नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. … Read more

भारतीय संस्कृतीमध्ये आजही शिक्षकाना मानाचे आणि आदराचे स्थान – प्रा. रामचंद्र सातवेकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात ५ सप्टेंबर २०२५ ” शिक्षक दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक हावळ होते. प्रारंभी माजी शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत हावळ यानीं उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय प्रमुख विनायक हावळ यांचे अध्यक्ष पदासाठी … Read more

error: Content is protected !!