मुरगूडच्या शिवराज विद्यालयाच्या वर्गमित्रांचा ४७ वर्षानीं भरला स्नेहमेळावा  १० वी १९७८ बॅच विद्यार्थांच्या शालेय जीवनातील भावनिक आठवणीनां उजाळा

मुरगूड ( शशी दरेकर ) शिवराज विद्यालय मुरगूडच्या १०वी मधील १९७८ बॅचचा स्नेहमेळावा सदाशिव मंडलिक महाविद्यालयाच्या कै. दादोबा मंडलिक सभागृहात संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते तर अध्यक्षस्थानी पी डी मगदूम होते.      कार्यक्रमात प्रथम सन्माननिय गुरुवर्यांच्या हस्ते दिपप्रजलन तसेच सावित्रीबाई फुले, छ. शिवाजी महाराज, कै. सदाशिवराव मंडलिक साहेब, … Read more

दिग्विजय प्रविणसिंह पाटील यांनी  केला उमेदवारी अर्ज दाखल विश्वनाथ पाटील ( आण्णा ) कुटूबीयातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय

मुरगूड ( शशी दरेकर )             कागल तालुक्यातील राजकारणात प्रभावी ओळख असलेल्या पाटील कुटुंबीयातील तिसरी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना शिंदे गटातून दिग्विजय प्रविणसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला.              या मतदारसंघातून बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रविणसिंह पाटील व मुरगूड नगरपालिकेच्या विद्यमान … Read more

मुरगूडच्या “आत्मरूप” गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्य विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ प्रणित श्री आत्मरूप गणेश मंदिर मुरगूड येथे गणेश जयंती व ३० व्या वर्धापन दिनानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार दिनांक २१/०१/२०२६ इ.रोजी सकाळी १०:०० वाजता  रक्तदान शिबिराचे आयोजन श्री वैभवलक्ष्मी ब्लड सेंटर कोल्हापूर. यावेळी प्रत्येक रक्त रक्तदात्यास मोफत प्रवासी बॅग. व दुपारी ४:०० वाजता हळदी … Read more

निढोरीच्या सुवर्ण गणेश मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्य विविध धार्मिक कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ):        निढोरी ता. कागल येथे ओम साई गणेश कला, क्रीडा, सांस्कृतिक मंच प्रणित सुवर्ण गणेश मंदिर अर्थात गोल्डन टेम्पलच्या वतीने उद्या गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे श्रीं ना अभिषेक, सकाळी नगरप्रदक्षिणा, दुपारी १२ वा. जन्म काळ, सायंकाळी ७ वा. … Read more

मुरगूड पालिकेच्या नगर अभियंत्याला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले मुरगूड परिसरात खळबळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मुरगूड ( शशी दरेकर ) हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे ७० लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगूड एस.टी. बसस्थानक परिसरात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणी … Read more

संजय मंडलिक व संजयबाबा घाटगे यांच्यातील एकीचा दुवा मी असणार – प्रवीणसिंह पाटील

मुरगूड ( शशी दरेकर )        नुकतीच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांची बैठक मुरगूड ता . कागल येथे आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी  यमगेचे सरपंच संदीप किल्लेदार होते .       यावेळी प्रविणसिंह पाटील म्हणाले नुकतीच नगरपालिका निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आम्हा भाजप – शिवसेना युतीला चांगले … Read more

मुलांमध्ये विचारांची प्रक्रिया विकसित करा: जॉर्ज क्रूझ यांचे आवाहन

कागल (प्रतिनिधी): “मुलांच्या शालेय जीवनात केवळ गुणांची स्पर्धा न करता, त्यांची विचार करण्याची प्रक्रिया विकसित करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी मुलांना लहानपणापासून वाचन, निरीक्षण आणि संवादाचे महत्त्व शिकवायला हवे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी केले. येथे आयोजित ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाले’चे दुसरे पुष्प गुंफताना ते ‘स्पर्धा परीक्षा व … Read more

दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूरचा एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय चित्रकला स्पर्धेचा १००% निकाल

दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूरचा एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय चित्रकला स्पर्धेचा १००% निकाल लागला आहे. या प्रशालेतून एलिमेंटरीसाठी २५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ‘ब’ श्रेणीत दहा व ‘क’ श्रेणीत पंधरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.तसेच इंटरमिजीएटसाठी २६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २ ‘अ’ श्रेणीत,१२ ‘ब’ श्रेणीत तर ‘क’ श्रेणीत १२ विद्यार्थ्यांनी यश … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या  मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची मागणी

मुरगूड (शशी दरेकर) : शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना मुरगूड शेजारी शाळेत घडली असून, एका नराधम मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित नराधम शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘शिवभक्त’ आणि समस्त मुरगूडवासीयांच्या वतीने मुरगूड पोलीस ठाण्यात निवेदन … Read more

मुरगूड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. महादेव कानकेकर यांची निवड उपाध्यक्षपदी जे के कुंभार तर सचिवपदी संदीप सर्युवंशी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मुरगूड प्रतिनिधी, माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी जोतीराम कुंभार( दै. जनमत) तर सचिवपदी संदीप सुर्यवंशी( दै. हॅलो प्रभात) यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविंद्र शिंदे( दै तरूण भारत) होते.           या बैठकीस प्रा. सुनिल डेळेकर( दै. … Read more

error: Content is protected !!