वाघापूरात ज्योतिर्लिंग जागर उत्साहात पहिली भाकणूक संपन्न

मडिलगे( जोतीराम पोवार): कोरोणा व्हायरस हद्दपार होईल, चांदी ,गुळाचे भाव उच्चांक गाठतील,स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल, इतर राज्यातील निवडणुकांत कमळ उमलेल, ऊसासाठी आंदोलन होईलवाघापूर ता. भुदरगड येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिर्लिंगा चा जागर चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात व भक्तीभावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोजक्‍याच मानकर्याच्या उपस्थितीत पार पडला. तत्पूर्वी आनंदा पाटील, बाजीराव पाटील … Read more

Advertisements

दसऱ्यानिमित्य आयोजित,मुरगड शहर होम मिनिस्टर चा मान सौ. कविता विक्रम रावण यांनी पटकावला

मुरगूड ( शशी दरेकर ) : राजू आमते युवा मंच व सस्पेन्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खास दसऱ्यानिमित्त विशेष महीलांसाठी अंबााई मंदीर परिसरामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. होम मिनिस्टर प्रथम क्रमांक पटकावला आहे तो सौ कविता विक्रम रावण यांनी तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून सौ. सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील(वहीनीजी) होत्या. तर महीला राष्ट्रवादी … Read more

लिंगनूर नदी पात्रात मगरीचा वावर

कागल (विशेष प्रतिनिधी) : लिंगनूर दुमाला ता, कागल येथील दुधगंगा नदी पात्रात असणाऱ्या जॅकवेल जवळ मागरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे लिंगनूर मधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नदीपात्रात मगर बघून गावातील नदीकाठच्या शेतकऱ्याना हादरा बसला आहे. एका सामान्य माणसाच्या निदर्शनास ही बाब येते मग ग्रामपंचायत काय करत आहे तसेच जीवित हानी झाल्यानंतर ग्रामपंचायत जागी होणार काय असा सवाल लिंगनूर मधील नागरिक करीत आहे. त्यामुळे वन विभागास ही घटना सांगून लवकरात लवकर याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी लिंगनूर गावातील नागरिकांतून होत आहे. एकंदरीत जिवित हानी रोखण्यासाठी प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा लिंगनूर मधील ग्रामस्थ आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी च्या योजना घराघरात पोहचवणार – राजे समरजीतसिंह घाटगे

केंद्रीय कृषीमंत्री ना.तोमर याची दिल्ली येथे घेतली भेट कागल (प्रतिनिधी) : शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत,त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून कशा पोहोचतील व त्या प्रभावीपणे कशा राबविता येतील यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे … Read more

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज येथे केली जोरदार निदर्शने

गडहिंग्लज(धनंजय शेटके) : उत्तर प्रदेश मधील लखिमपुर येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या वर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील वाहनाने बेदरकार पने चिरडल्याने सहा शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत त्या मुळे संपूर्ण देशभरात जनक्षोभ उसळला आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज राज्य बंद ची हाक दिली होती. गडहिंग्लज मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून महविकास आघाडी च्या … Read more

मुरगूडमध्ये लखीमपुर येथील शेतकरी हत्याकांडाचा जाहीर निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने गाडीखाली चिरडून मारण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना अतिशय निंदणीय आणि तीव्र चीड आणणारी आहे. मुरगुडची स्वाभिमानी जनता या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. भाजपच्या या निर्दयी मंत्र्यांचा जाहीर निषेध. सदर घटनेचा निषेध … Read more

शाहू साखर कारखाना देणार एकरकमी एफ आ पी – समरजितसिंह घाटगे

एकरकमी एफ आर पी देण्याची घोषणा करणारा राज्यातील पहिला कारखाना कागल(प्रतिनिधी): येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम -२०२१-२०२२ साठी एफ आर पी ची होणारी २९९३/- रूपये इतकी रक्कम एकरकमी देणार आहे.अशी घोषणा चेअरमन समरजीतसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली.या हंगामातील एफ आर पी ची रक्कम एक रकमी देण्याचा निर्णय जाहीर करणारा शाहू … Read more

बामणी येथील मॅरेथॉन स्पर्धेत साहिल मगदूम प्रथम

सिद्धनेर्ली,ता.४ः बामणी ता कागल येथील मॅरेथॉन स्पर्धेत साहिल जयराम मगदूम याने प्रथम क्रमांक पटकाविला. विवेक बाबुराव कांबळे व यश विठ्ठल पवार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.

कालवा अकॅडमी मार्फत या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या स्पर्धकांना उपसरपंच तानाजी मगदूम, शिवाजी मगदूम, बाबुराव मगदूम, अरविंद बाबर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण केले. स्पर्धेचे संयोजन स्वप्निल बाबर, आदेश पाटील, पांडुरंग मगदूम ,अनिकेत मगदूम, भारत पाटील,रोहित पाटील यांनी केले.

मुरगूडच्या ” जान्हवी सावर्डेकर ” हिने राज्यपॉवरलिप्टींग अजिंक्यपद स्पर्धत पटकावली चार सुवर्णपदके

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड मुरगूड (शशी दरेकर) : औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशनच्या सब-ज्युनियर, ज्युनियर , सिनियर व मास्टर्स I ते IV (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्विण्ड अण्ड अनइक्विण्ड) अजिंक्यपद स्पर्धत येथील जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने तब्बल ४ सुवर्णपदके पटकावली आहेत. तिची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्र … Read more

महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या – शिवसेनेचे निपाणी सीपीआय शिवयोगी यांना निवेदन

साके (सागर लोहार) : कर्नाटक निपाणी सीमा भागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली,लिंगनूर,मुरगुड,गलगले, अर्जुनी, ही गावे निपाणी ला लागून आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावातील नागरिक व्यापारी शालेय विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक असा प्रवास करत असतात. पण गेल्या काही दिवसापासून कर्नाटकचे पोलीस इथे थांबत असल्याने या मार्गावरून मुरगुड – निपाणी एसटी … Read more

error: Content is protected !!