रखरखत्या उन्हामुळे पिके करपली

कागल (विक्रांत कोरे) : रखरखत्या उन्हामुळे माळरानातील पिके करपून गेली होती. अवकाळी पडलेल्या पावसाने या पिकांना पुन्हा पालवी फुटली आहे. करपलेली पाने हिरवीगार होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे.       मे महिना म्हणजे रखरखते ऊनं विहीर ,ओढे,व  नाले यांचे पाणी आटलेले.या रखरखत्या उन्हामुळे पिकांना पुरेशी पाणी मिळत नाही ,किंबहुना मिळालेच नाही. त्यामुळे शेतकरी … Read more

Advertisements

विश्वासाने दिलेले दागिने परत न दिल्याने केला गुन्हा नोंद

कागल /प्रतिनिधी : विश्वासाने दिलेले दागिने परत न दिल्याने कागल पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. १ लाख ७२ हजार ५००रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार बाचणी तालुका कागल येथे घडला आहे.          केराबाई सुभाष महेकर वय वर्षे 55 व सुभाष गोविंद महेकर वय वर्षे 62 मूळ राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी सध्या राहणार बाचणी तालुका … Read more

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत डेंग्यू रुग्ण मोहीमेला सुरुवात

कोल्हापूर, दि.26 (जिमाका): जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण संख्येत होणाऱ्या वाढीचे कारण म्हणजे मोठी धरणे, लहान, छोटे, मध्यम प्रकल्प व त्यामुळे बागायती शेतीची झालेली वाढ त्या अनुषंगाने स्थापन झालेले साखर कारखाने तसेच औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात बाह्य मजुरांची म्हणजेच परराज्यातुन व परजिल्ह्यातून येणारे मजूर ही संख्या फार मोठी आहे. जिल्ह्यात विविध कामासाठी ऊसतोड मजुर, विटभट्टी … Read more

मुरगूडच्या सानिका स्पोर्ट्सचे  कार्य समाजाभिमुख – प्राचार्य एस पी पाटील

मुरगुड  ( शशी दरेकर ) – मुरगुड तालुका कागल येथील सानिका स्पोर्ट्स ने आज पर्यंत अनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. गरजूना मदतीचा हात कायम पुढे करून सेवा करण्याचे काम या स्पोर्ट्स मार्फत अव्याहतपणे सुरू आहे. सानिका स्पोर्ट्स चे कार्य कौतुकास्पद असून ते समाजाभिमुख आहे असे प्रतिपादन मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजचे … Read more

उजळाईवाडी महामार्ग मदत केंद्र यांच्या वतीने हेल्मेट वापरा बाबत जनजागृती

कागल ( प्रतिनिधी) : कागल येथील लक्ष्मी टेकडी येथे उजळाईवाडी महामार्ग मदत केंद्र यांच्या वतीने पुणे-बेंगलोर हायवे रस्त्यावर हेल्मेट वापरण्यासाठी व रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने वाहनांचा वेग मर्यादित ठेवून वाहने चालवण्यासाठी मार्गदर्शन व विनंती करण्यात आली. उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र यांनी हेल्मेट बदल जनजागृती करून लोकांना मार्गदर्शन केले. पो.हे.कॉ आनंद माने, पो.हे.कॉ चंद्रशेखर, लं … Read more

वेदगंगेच्या कुरणी बंधाऱ्याजवळील ओढ्यातील कचरा, गाळ, बाटल्या ट्रकभर काढला बाहेर

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड जवळ च्या कुरणी बंधाऱ्या जवळ वेद गंगेला मिळणाऱ्या ओढ्यात अगदी तोंडावर टाकाऊ बाटल्यांचा ढीग, पाण्याच्या, औषधाच्या, कीटक नाशकांच्या अशा नाना तऱ्हेच्या बाटल्या होत्या. नदीच्या संगमावर हा ढीग म्हणजे जणू वेद गंगेला कचऱ्याचा आहेरच होता.    नेहमीच स्वच्छता आणि सामाजिक कामात अग्रेसर  असणाऱ्या शिवभक्त स्वयंसेवकांच्या निदर्शनास ही बाब येताच … Read more

उबाठाचे शिवसैनिक मनोहर नलगे यांचा पोलिंग बुथवर काम करताना मृत्यू

खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे यांची आदरांजली आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे केले सांत्वन मुरगूड ( शशी दरेकर ) : मुंबई येथील वरळी विभागात पोलिंग बुथवर कार्यरत असणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मनोहर रामचंद्र  नलगे (वय 62  )यांचा बुथवर काम करत असताना मृत्यू झाला. मनोहर नलगे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड ता. कागल येथे त्यांच्या … Read more

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची आंबा महोत्सवास भेट

कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट राज्य कृषि पणन मंडळ कोल्हापूर आयोजित, उत्पादक ते ग्राहक या योजने अंतर्गत सुरु असलेल्या कोल्हापूर आंबा महोत्सव 2024 या ठिकाणी अमोल येडगे, जिल्हाधीकारी, कोल्हापूर यांनी सदिच्छ भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक, डॉ.सुभाष घुले यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. आंबा महोत्सवामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक आंबा उत्पादकाशी संवाद साधून … Read more

सांगाव येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

कागल(विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी. काठी व दगडाचा वापर झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत.ही घटना रविवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मौजे सांगाव येथील शेतात घडली. कागल पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.            पोलीस ठाण्यातील माहितीनुसार महेश अण्णासो पाटील, निलेश अण्णासो पाटील, अंकुश … Read more

वाय. डी. माने इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कागल मध्ये १२ वी नंतर करिअर मार्गदर्शन विद्यार्थी – पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल : दि कागल एज्युेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांचे वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप मुरतले यांनी कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश व करिअर घडविण्याचा विविध कोर्सेस बद्दल पालकांना व  विद्यार्थ्यांना जागरूक केले. त्याचप्रमाणे पालकांना आपल्या पाल्यासाठी जागृत राहणे … Read more

error: Content is protected !!