मुरगूड (शशी दरेकर) : राधानगरी येथिल शासकीय निवासी शाळेमध्ये सन२०२४ -२५मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात व पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्य – पुस्तक, टॅब , व इतर शालेयउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किरवेकर मॅडम यानीं नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेबद्दल माहिती दिली . यावेळी समतादूत सौ. आशा रावण , व श्री . किरण चौगले यानीं मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक कांबळे सर यानीं केले तर आभार सौ . पाटील मॅडम यानीं मानले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, गृहपाल, शिक्षक – शिक्षिकेतर, कर्मचारी वर्ग, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.