कराड येथील पत्रकार परीषदेत किरीट सोमय्यांची उडाली भेंबरी पत्रकारांच्या प्रश्नावर फुटला घाम; पत्रकारांवर खेकसलेही

   कराड(वार्ताहर) : राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सनसनाटी आरोप करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची आज कराड मधील पत्रकार परिषदेत अक्षरशः भेंबरी उडाली. पत्रकारानीं विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देतांना त्यांना घाम फुटला . केन्द्रींय मंत्री नारायण राणे यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले. हा प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.ते प्रश्न विचारणारया पत्रकारांवरही … Read more

Advertisements

मुरगूडमध्ये किरीट सोमय्यानां प्रवेशबंदी करा ; मुरगूडच्या राष्ट्रवादी काँगेसचे मुरगूड पोलीस ठाण्यास निवेदन

मुरगूड : (शशी दरेकर)राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटेनाटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मने दुखावणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या मुरगूड पोलिस स्टेशन येथे भेट देणार आहेत. मुरगुड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी किरीट सोमय्या यांना मुरगूड शहरात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषदेत करण्यात … Read more

मुरगूडवासीयाकडून ” अशोक दरेकर ” यांचा यथोचित सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुंबई येथिल राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषदेतर्फै दिला जाणारा राज्यस्तरीय गुणीजनरत्न जीवनगौरव पुरस्कार ऑनलाईन सोहळ्याव्दारे श्री . अशोक धोंडिबा दरेकर यानां-प्रदान करण्यात आला होता,शासकीय सेवेत असतानां शाळा , धरणे , बोगदे , कालवे , जलसेतू , पाणी पुरवठा योजना अंतर्गत कामे उत्तमरित्या पूर्ण केलेबद्दल त्यानां राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्कार , … Read more

चिमगांव येथील जागेची महावितरण कडून पाहणी; मुरगूडसह परिसरातील ५४ गावांचा वीजेच्या वापराचा प्रश्न मार्गी लागणार

मुरगूड ( शशी दरेकर्) : मुरगूड शहर व परिसरातील ५४ गावाना लागणाऱ्या वीजेसाठी ३३ केव्हीचे वीज केंद्र मंजूर झाले आहे . त्यासाठी स्थापत्य विभागाच्या पथकाने आज चिमगांव येथील चिमकाईदेवी परिसरातील शासकीय गायरानाच्या जागेची पाहणी केली आहे. त्यामुळे हे केंद्र लवकरच उभारणीचा मार्ग मार्गस्थ होणार असल्याने ५४ गावांचा वीजेच्या वापराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मुरगूड शहर … Read more

गडहिंग्लज मधील गणेश मंडळांना समरजीतसिंह राजे घाटगे यांची भेट

गडहिंग्लज – धनंजय शेटके भाजपचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व श्री शाहु साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह राजे घाटगे यांनी गडहिंग्लज शहरातील गणेश मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या.सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.सर्वच राजकीय नेते मंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजेंचे स्वागत मोठ्या उत्साहात फटाके फोडून केले.राजेंनी पिराजी पेठ येथील स्वराज्य ग्रुपच्या गणरायाला भेट देत श्री … Read more

किरीट सोमय्याच्या विरोधात दाव्यासाठी कागल शहरातून 25 लाख रुपये – माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर

रविवारी होणार मंत्री मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत या बैठकीत किरीट सोमय्या यांचा केला जाहीर निषेध कागल : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे . यासाठी न्यायालयात ठरावीक रक्कम भरावी लागणार आहे . त्यासाठी आम्ही कागलकर पंचवीस लाख रूपये गोळा … Read more

मुरगूडच्या गणराज तरुण मंडळाने सादर केला कराओके संगीताचा कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) –मुरगूड ता. कागल येथील श्री. गणराज तरूण मंडळाच्या वतीने कराओके संगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथमतः रात्री आठ वाजता श्री. गणरायाची आरती मुरगूडचे नगराध्यक्ष श्री. राजेखान जमादार, माजी नगरसेवक श्री. सुनिल रणवरे, औंकार दरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर ” कराओके ” संगीताच्या कार्यक्रमात अभियंता आकाश दरेकर, विनायक रणवरे, … Read more

कसबा सांगाव मध्ये आघाडीत फूट सात सदस्यांचे राजीनामे

कसबा सांगाव : कसबा सांगाव ( ता.कागल ) येथील विद्यमान उपसरपंच विक्रमसिंह जाधव व सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच रणजित कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले. कसबा सांगाव ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करत आपला अधिकार डावलल्याची भावना व्यक्त करत सदस्यांनीही राजीनामे सादर केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.पी कांबळे उपस्थित होते. सकाळी दहाच्या सुमारास चावडी चौकात ग्रामस्थांनी मोठ्या … Read more

वंदूर ग्रामपंचायतीकडून गणेश मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम

वंदूर (महेश कांबळे) : पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी वंदूर(ता. कागल) ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने कृत्रिम कुंड तयार करून यामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या, सुमारे १५० हून अधिक गणेश मुर्ती व निर्माल्य यावेळी दान करण्यात आले. या उपक्रमासाठी सरपंच सविता हिरेमठ, बबन खोडवे, सागर बागणे, ग्रामविकास अधिकारी … Read more

सिद्धनेर्लीत 1500 वर गणेश मूर्तीदान

सिद्धनेर्ली (लक्ष्मण पाटील)- येथे दूधगंगा नदी काठावर नागरिकांकडून विसर्जनासाठी आणलेल्या 1500 हुन अधिक मूर्ती व टन निर्माल्य दान जमा केले . समाज विकास केंद्र संचालिक ,स्वामी विवेकानंद अभ्यासिका , ग्रामपंचायत, राजश्री शाहू , सामाजिक समरसता मंच, शाहिद भगतसिंग विचार मंच ,निसर्ग व पर्यावरण संघटना यांच्यातर्फे 16 व्या वर्षी मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबवला. यात … Read more

error: Content is protected !!