कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर महिन्याच्या 1 तारखेपासून 30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी फी रुपये 200 इतकी असून प्रशिक्षणासाठी इच्छुक व्यक्तींनी दर महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. प्रविण नाईक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.