कागल (प्रतिनिधी): कागल येथून 38 वर्षी इसम बेपत्ता झाला आहे. कागल पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजेश तात्याराम कुटे, राहणार – मुळगाव मुक्काम- पोस्ट -तालुका -कुसुम नगर,भूम, जिल्हा -धाराशिव (उस्मानाबाद),सध्या राहणार- जयसिंग पार्क,कागल. असे बेपत्ता इसमाचे नाव आहे.
जयश्री राजेश कुठे यांनी कागल पोलिसात दिलेल्या वर्दीत म्हटले आहे. राजेश कुठे आहे तारीख 27 एप्रिल रोजी घरातून बाहेर पडले कामावर जातो असे त्यांनी सांगितले. नातेवाईका कडे शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. अंगाने सडपातळ रंगाने गोरे उंची पाच फूट सहा इंच केस काळे नाक सरळ अंगात पिवळा रंगाचा टी-शर्ट निळी जीन्स पॅन्ट पायात चप्पल मराठी भाषा बोलतात असे वर्णन आहे

कागल पोलीस ठाण्याचे हवालदार अरुण आपके यांनी फिर्याद नोंदविली आहे.पुढील तपास हवालदार विजय पाटील हे करीत आहेत. बेपत्ता इसम कोणास आढळल्यास कागल पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.