कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: मतदार यादीतील हरकतीसाठी मुदतवाढ

हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर २०२५ कागल : कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादीचा कार्यक्रम-२०२५ जाहीर केला आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी दिनांक ०८/१०/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हरकती व सूचना दाखल … Read more

कागल तालुक्यातील मुरगुड येथे चोरी; सुमारे ६०,००० रुपयांचा ऐवज लंपास

मुरगुड : कागल तालुक्यातील मुरगुड येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी खिडकीचा गज वाकवून प्रवेश करत अंदाजे ६०,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दि. ११/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून दि. १२/१०/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या दरम्यान घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. नेमकी घटना: या घटनेची फिर्याद … Read more

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमध्ये सिमेंट व्यापाऱ्याचे अपहरण

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमध्ये मंगळवारी दुपारी पैशांच्या व्यवहारातून एका सिमेंट व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी … Read more

मुंबईत सरन्यायाधीशांवर हल्ल्याविरोधात वकीलांचे आंदोलन, AILUचे देशव्यापी निषेधाचे आवाहन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर कोर्ट रूम परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील अंधेरी न्यायालयातील अधिवक्त्यांनी आणि ऑल इंडिया लॉयर्स युनियन (AILU)ने जोरदार आंदोलन केले. मुंबई सीजेएम न्यायालयासमोर झालेल्या या निदर्शनात अॅड. चंद्रकांत बोजगर, अॅड. बलवंत पाटील, अॅड. सुभाष गायकवाड, अॅड. नंदा सिंह, अॅड. पीएम चौधरी, अॅड. सुल्तान शेख, अॅड. यादव यांसह … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३ दिनांक ०९-१०-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

पुणे टपाल क्षेत्रात ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ उत्साहात; आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘लोकाभिमुख’ सेवांवर भर

पुणे (प्रतिनिधी): भारतीय डाक विभागाकडून (India Post) ६ ऑक्टोबर २०२५ ते १० ऑक्टोबर २०२५ या दरम्यान ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. टपाल विभागाचे सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल क्षेत्रातील योगदान लोकांपर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ (UPU) च्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘जागतिक टपाल दिन’ … Read more

निधन वार्ता – पांडूरंग वंडकर

मुरगूड येथील पांडूरंग गणपती वंडकर (वय ७९) यांचे आकस्मित निधन झाले. ते मुरगुडमधील जुन्या काळातील प्रसिद्ध टेलर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुरगूडमधील हॉटेल दावत चे मालक व माजी नगरसेवक राहुल वंडकर, विवेक वंडकर, योगेश वंडकर यांचे ते वडिल होत. रक्षाविसर्जन गुरूवार ता. ९ … Read more

कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रभाग आरक्षण सोडत जाहीर !

कागल: आगामी कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे इच्छुकांचे लक्ष लागलेल्या अनेक प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रभाग क्रमांक १ ते ११ मध्ये कोणत्या जागा कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत, याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. एकूण २२ जागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे, ज्यात ११ जागा … Read more

मुरगूड येथे शिवप्रेमीतर्फै मंडलिक साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल शिवप्रेमीतर्फे सर्वसामान्यांचे आधारवड , हरितक्रांतीचे प्रणेने , बहुजनांचे कैवारी मा . खा . स्व . सदाशिवराव मंडलिकसाहेब यानां ९१ व्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन विकी साळोखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे मंडलिक साहेब अमर रहे … Read more

यमगेच्या सरपंचपदी संदीप किल्लेदार-पाटील बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) : यमगे ता.कागल येथील सरपंचपदी संदीप केशवराव किल्लेदार -पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी सचिन हाके होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत हलगी कैचाळच्या ठेक्यावर नूतन सरपंचाची मिरवणूक काढली. यमगे ग्रामपंचायतीवर मंत्री हसन मुश्रीफ संजय घाटगे गटाची सत्ता आहे. यामध्ये या आघाडीकडे सहा तर विरोधी मंडलिक … Read more

error: Content is protected !!