गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले

वाहतूक विस्कळीत, कोणतीही हानी नाही गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : आज दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेले एक मोठे जीर्ण झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, औद्योगिक वसाहत कामगारनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली. … Read more

Advertisements

कागल येथील अशोका हॉटेलसमोरील बोगदा वाहतूक कोंडीचे केंद्र

नागरिक संतप्त, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कागल (सलीम शेख ) : कागल शहरातील अशोका हॉटेलसमोरील बोगदा (Underpass) सध्या वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडतात, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. याशिवाय, संध्याकाळच्या वेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले … Read more

सुळकूड येथे दुधगंगा नदीच्या जुन्या पुलावर पाणी; वाहतूक नवीन पुलामुळे सुरळीत

सुळकूड: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीची पाणी पातळी वाढली असून, अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. आता सुळकूड येथील जुन्या पुलावरही लवकरच पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, सुदैवाने येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली … Read more

‘नीरज चोप्रा’ पुस्तकासाठी संजय दुधाणेंना मसाप ग्रंथ पुरस्कार

पुणे: ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘नीरज चोप्रा’ या पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (मसाप) प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला. दिल्लीच्या सुप्रसिद्ध … Read more

कागल तालुका बाजार समितीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार नाही, असा कोणताही निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आता कागल येथे आपला उपबाजार (sub-market) सुरू करणार आहे. यासाठी बाजार … Read more

११ वी प्रवेश प्रक्रिया: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

मुंबई : इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे पहिल्याच दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करता यावी … Read more

बाचणीत मध्यरात्री मोठी चोरी: तीन ज्वेलर्स दुकाने, बार आणि घराला लक्ष्य, चोरटे सीसीटीव्हीत कैद

बाचणी (तानाजी सोनाळकर) : रविवारी मध्यरात्री बाचणी गावातील भर वस्तीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ज्वेलर्सची दुकाने, एक बार आणि एक घर लक्ष्य केले. या मोठ्या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, कागल पोलीस पुढील तपास करत आहेत. चोरीचा तपशील रविवारी रात्री, गावकरी गाढ झोपेत असताना, चोरट्यांनी एकाच रात्रीत … Read more

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको !

मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे पासून राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, कोरडे वातावरण आणि तापमानात वाढ दिसून येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी, … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३७ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३७ दिनांक २६-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने राष्ट्रीय महामार्गाची केली दाणादाण

अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त कागल / प्रतिनिधी: यंदा मे महिन्यातच कोसळलेल्या विक्रमी मान्सूनपूर्व पावसाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दुर्दशा केली आहे. कागलजवळ, विशेषतः दुधगंगा नदीजवळच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघातही वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वर्दळ असते. दळणवळणाचे … Read more

error: Content is protected !!