gahininath samachar
जिल्ह्यात 23 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्याला जादा दर द्यावेत तसेच सकल मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी करण्यात येणारी आंदोलने, साखळी उपोषण तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून … Read more
विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून जाणून घेतले निरनिराळ्या क्षेत्रातील कामकाज
निकम विद्यालयाची निरनिराळ्या ठिकाणी व्यावसायिक क्षेत्रभेट पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील): वर्तमान काळात व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असल्याचा दिसत असल्याने दर दिवशी नवनवीन पद्धतींचे व्यवसाय उदयास येत आहेत ज्यामुळे न केवळ बेरोजगारी कमी होत आहे तर सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील सहाय्य मिळत आहे. विद्यार्थ्याला एक उत्तम उद्योजक बनण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रभेट ही फायदेशीर ठरते हा उद्देश डोळ्यासमोर … Read more
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे- राज्यपाल रमेश बैस
सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि विविध संस्थांचा सत्कार मुंबई, दि.7 : भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच, नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी,युद्धात अपंगत्व तसेच … Read more
मुरगूड विद्यालयात १४ पासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
मुरगूड विद्यालयात भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला अनुसरून शिक्षण प्रसारक मंडळ मुरगूड संचलित मुरगूड विद्यालय (ज्युनि कॉलेज /हायस्कूल) व पंचायत समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमानाने ५१ वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मुरगूड विद्यालयात केले आहे. १४ ते १६ डिसेंबर अखेर या प्रदर्शना मध्ये भरगच्च … Read more
मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व्होकेशनलचे माजी विभागप्रमुख प्रा.एस.एन.अंगज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार सर हे होते … Read more
लघु व मध्यमवर्गीय वृत्तपत्रांचा छळ थांबवावा – केशवदत्त चांडोला
वेरावळ (सोमनाथ) : लघु व मध्यमवर्गीय वृत्तपत्रांची छळवणूक थांबविण्याची मागणी केली.जाहिरात धोरणातील त्रुटी दूर करण्याची मागणी आर. एन. आय. आणि सी. बी. सी. च्या कार्यशैलीवर वेरावळ (सोमनाथ), गुजरातमध्ये टीका करण्यात आली. भारतीय लघु आणि मध्यम वृत्तपत्रांच्या असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक माहेश्वरी भवनाजवळ असलेल्या टी.एफ. येथे झाली. सी. सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. दीपप्रज्वलन करून सभेचे … Read more
बिद्रीत पुन्हा के. पी. च ‘ लय भारी ‘ ! विरोधकांचा धुव्वा ; सर्वच्या सर्व २५ जागांवर विजय
मुरगूडमध्ये सत्तारूढ गटाचे प्रविणसिंह पाटील यांचे जल्लोशी स्वागत मुरगूड ( शशी दरेकर ) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने २५ पैकी २५ जागा जिंकत … Read more
कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरती
कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि. 8 डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे. अशासकीय पहारेकरी हे … Read more
दिव्यांग व्यक्तींकडे UDID कार्ड नसेल तर ८१०७०४०२०२ या क्रमांकावर संपर्क करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि. 2 : जिल्हयातील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही दिव्यांग पुरुष व महिलांकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अथवा त्यांच्यासाठी खासकरुन शासनाकडून देण्यात येणारे UDID (यू.डी.आय.डी.) कार्ड जर नसेल तर अशा व्यक्तींचे नाव, त्याचा फोन नं. आणि कोणत्या गावात अथवा शहरात राहतो, त्या गाव शहराचे नाव ८१०७०४०२०२ या क्रमांकावर Whatsapp/SMS व्दारे पाठवावे किंवा संबंधीत दिव्यांग व्यक्तीला वरील नंबरवर … Read more