नवरात्री उत्सवनिमित्त कागलच्या ऐतिहासिक श्री राम मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

कागल (विक्रांत कोरे) : शारदीय नवरात्री उत्सवनिमित्त येथील ऐतिहासिक श्री राम मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री राम मंदिर देवस्थान जिर्णोध्दार समितीच्यावतीने या सर्व कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.आज सोमवारी (ता.२३) सकाळी मंत्रोघोषात अभिषेक व विधीवत घटस्थापना करुन या उत्सवास प्रारंभ झाला. कागल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाहू ग्रुपचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या … Read more

अडीच लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ठ -चेअरमन संजयबाबा घाटगे

‘अन्नपूर्णा`चा ६ वा बॅायलर अग्नीप्रदिपन सोहळा व्हनाळी (वार्ताहर) : गेली ४ वर्षे अतीशय खडतर प्रवासातून मार्गक्रमण करत कारखाना चालवला आहे. सुरूवातीला प्रतिदिन ११०० मेट्रीक टन गाळप केले होते आता. आत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून त्यामध्ये मोठे बदल केले आहेत. पुर्वी ४ मिल होत्या यंदा ५ वी झिरोमिल बसवून आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेतल्या आहेत. त्यामुळे गाळप क्षमता … Read more

यमगे येथे उद्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाट्न

आयपीएस बिरदेव डोणे यांचा पुढाकार मुरगूड ( शशी दरेकर ) : “बुके नको, बुक द्या” या आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांच्या अनोख्या आवाहनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम उभा राहिला आहे. त्यांचे जन्मगाव यमगे ता.कागल येथे श्री विठ्ठल-बिरदेव अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येत आहे.याचा लाभ थेट ग्रामीण … Read more

शाही दसरा महोत्सवाचा उद्या भव्य शुभारंभ

शुभारंभ प्रसंगी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व ‘गाथा शिवशंभूची’ ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन कोल्हापूर : जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा शुभारंभ उद्या 22 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व लोकसभा सदस्य श्रीमंत शाहू महाराज छत्रपती … Read more

मुरगूडमध्ये हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या वतीने रेखाकला कार्यशाळा यशस्वी

मुरगूड ( शशी दरेकर) : येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयच्या वतीने महाराष्ट्र रेखाकला  (एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ) परीक्षा एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा परिसरातील १२ माध्यमिक विद्यालयांच्या शाळांच्या सुमारे अडीचशे हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.  कार्यशाळेत चित्रकला विषयाचे अनुभवी तज्ञ कलाशिक्षक संदीप मुसळे (स्थिऱ चित्र), महेश सुर्यवंशी (अक्षरलेखन), संभाजी भोसले (संकल्प चित्र व भूमिती), मोहन … Read more

कोल्हापूर येथे रानभाजी महोत्सव : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची राज्यस्तरीय आयोजनाची मागणी

कोल्हापूर : पावसाळ्यात डोंगरदऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व ओळखून, या भाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न राहता तो राज्यस्तरावरही आयोजित केला जावा, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील स्मृती भवनात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री … Read more

21 सप्टेंबर – जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day)

जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day) हा दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. अल्झायमर हा विस्मरणाशी संबधीत आजार आहे. यावर्षीच्या  अल्झायमर आजाराची थिम डिमेन्शिया बद्दल विचारा, अल्झायमर बद्दल विचारा.. ही आहे. यामध्ये अल्झायमर आजाराबद्दल माहिती देणे, लवकर निदान करणे, उपचारासाठी प्रोत्साहन देणे, सामाजिक कलंक कमी करणे,  आजाराबद्दलची जागरुकता वाढविणे व खुल्या  संवादाला … Read more

कागल तालुक्यात गणेश मंडळांचे कौतुक: वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन

कागल: कागल तालुक्यात सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अनेक मंडळांनी या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवले. हे उपक्रम केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर राबवण्याचे आवाहन लोहार यांनी केले. येथील शाहू वाचनालयामध्ये आयोजित गणराया अॅवॉर्ड वितरण समारंभात ते बोलत होते. “भारतीय … Read more

कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी चर्चासत्र

कोल्हापूरच्या विकासाला ‘चित्रनगरी’मुळे चालना मिळेल का? कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रनगरी: कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार’ या चर्चासत्राचे उद्‌घाटन सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. हॉटेल सयाजी येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम झाला. कोल्हापूर चित्रनगरीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला कशा प्रकारे चालना मिळू शकते, यावर या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले. … Read more

कोल्हापुरात ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात, तीन टप्प्यांत अभियान राबवणार

कोल्हापूर : जनतेच्या सेवेसाठी महसूल विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ सुरू केले असून, या अंतर्गत १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ सुरू झाला आहे. हा पंधरवडा २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा जलदगतीने मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. या अभियानाचे तीन प्रमुख टप्पे आहेत: पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर): यामध्ये ‘पाणंद … Read more

error: Content is protected !!