आषाढी एकादशी निमित्य विठुरायाच्या पालखीचे मुरगूड मध्ये ठिकठिकाणी भक्तीमय वातावरणात स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ):  आज देवशयनी आषाढी एकादशी.मुरगूड मधील विठ्ठल मंदिरा पासून विठ्ठल रूक्मिणी ची शानदार पालखी काढण्यात आली. अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखीचे ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले.   ” विठु माऊली तू माऊली जगाची   राजा तू पंढरीचा..राजा तू पंढरीचा    अवघे गर्जे पंढरपूर, चालला विठू नामाचा गजर.” अशा भक्तिगीतांच्या तालावर विठ्ठल भक्तांनी शहरातील … Read more

Advertisements

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० जुलै रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल तालुक्यात नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळख असणारी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २०२४/ २५ सालाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २० जुलै रोजी दुपारी ठिक १२ वाजून ३० मिनिटानी श्री. लक्ष्मी-नारायण नागरी सह. पतसंस्थेच्या हॉलमध्ये बोलविण्यात आली आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न … Read more

मुरगूड मधील जनावारांच्या बाजारात चांगल्या सुविधा मिळाव्यात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरामधील मध्यवर्ती असणारा जनावरांच्या बाजारामधून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते मात्र त्या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी देत असलेल्या पावतीच्या मानाने त्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. ठिक-ठिकाणी पाणी साचल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण देखील वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये … Read more

मुरगुड नगरपालिका नोकर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत गोधडे तर व्हा.चेअरमनपदी विजय कांबळे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मुरगूड नगरपालिका नोकर सहकारी पत संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नूतन संचालक  मंडळाची बैठक संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये संस्थेच्या चेअरमन पदी जयवंत ज्ञानदेव गोधडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी विजय दत्तात्रय कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे … Read more

मुरगूडच्या सरपिराजीराव तलावाचे शिवभक्त्ताकडून पाणी पूजन

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव शनिवारी पूर्ण क्षमतेने भरलाआहे . कित्येक वर्षात पहिल्यांदाच एक महिना अगोदर भरलेल्या या तलावाच्या पाण्याचे पूजन शिवभक्तांनी केले. यावेळी  मंत्रोच्चारासह  विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. तसेच शहराचा जीवनसाथी असलेल्या तलावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी भूमिपूजन, आकाश पूजन, पाणी पूजन  करण्यात आले. त्यानंतर तलावास … Read more

नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्या मंदिर मध्ये योग दिन साजरा

कागल: नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल शाळेमध्ये 21 जून योग दिन योगासन व वृक्ष संवर्धन ने साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक श्री संतोष सुरेश पाटील सर व कृष्णात पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून घेतले योगासनाचे आजच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले. सर्व विद्यार्थी शिक्षक पालक योगासनामध्ये सहभागी झाले. दर दिवशी योगासन करण्याचे प्रतिज्ञा घेतली … Read more

पैशाचे पाकीट ज्येष्ठ नागरिकाला वडाप वाहतूकदाराने केले प्रामाणिकपणे परत

मुरगूड ( शशी दरेकर ): यमगे ता. कागल येथील वडाप वाहतूक व्यावसायिक सुधाकर महादेव हुल्ले यांनी आदमापुर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ नरहरी तळेकर वय ८९ रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा यांना त्यांचे गहाळ झालेले पाकीट प्रामाणिकपणे परत दिले.         काल रात्री ७ वा. देवदर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ तळेकर यांना  मुधाळ तिट्ट्यावरून आदमापूर येथे वडाप व्यावसायिक … Read more

जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी – पाटील यांनी घेतले १० टीबी पेशंट दत्तक

मुरगूड ( शशी दरेकर ) : मा. जिल्हाधिकारी,कोल्हापूर श्री.अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, तालुका आरोग्य अधिकारी, कागल डॉ.फारूक देसाई यांनी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत  “निक्षय मित्र” होऊन  क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करणेबाबत आवाहन केले आहे, या आवाहनास प्रतिसाद म्हणून मुरगूड येथिल श्री. जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी यांनी संमती दिलेल्या १०  क्षयरुग्णांना … Read more

मुरगूडच्या ओंकार पोतदार यांना राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न  पुरस्कार जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : गुरूवर्य सेवा प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुरूवर्य पुरस्कारासाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तिंना हा पुरस्कार जाहिर करण्यात येतो. यावर्षी राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न पुरस्कार मुरगुड ता. कागल येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ओंकार पोतदार याना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंढरपूर, जयसिंगपूर, कोल्हापूर, … Read more

मुरगुड शहरातील मटण मार्केटची दुरावस्था – मुख्याधिकारी यांना निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : जवळजवळ चार दशके सुरू असलेले मुरगूड मधील मटण मार्केट आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मार्केट मधील दहा गाळ्यांपैकी आता फक्त एखादा दुसरा गाळा सुरू असतो. पाण्याची व्यवस्था पण नाही त्यामुळे विक्रेत्यांना लांबून पाणी आणावे लागते. सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य आहे.त्यामुळे ग्राहक नाके मुरडतात व बाहेरच्या बाहेर निघून जातात.मटण … Read more

error: Content is protected !!