श्रावणात ‘वर्तेट’ ग्रंथाचे सामूहिक पारायण यशस्वीरीत्या पूर्ण

आडी (ता निपाणी): येथील संजीवन गिरीवरील श्रीदत मंदिरात पारायण कर्त्या भाविकांनी वर्तेट ग्रंथ पारायण समारोपाच्या अनुषंगाने दतगुरुच्या तसेच प .पू परमात्मराज महाराजांच्या दर्शनांसाठी मोठी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातीलपवित्र वातावरणात परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या ‘वर्तेट’ या आध्यात्मिक ग्रंथाचे समाज माध्यमाचा उपयोग करून सामूहिक पारायण यशस्वीरीत्या पूर्ण झाले. श्रावण मासारंभ दि. २५ … Read more

Advertisements

नारळी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त विविध उपक्रम नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल तीन उपक्रम संपन्न

उपक्रम क्रमांक १. रंगीबेरंगी राख्या तयार करणे. यामध्ये विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनी वेगवेगळ्या प्रकारच्या विविध रंगाच्या राख्या बनवण्याची कला व प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये शाळेतील महिला शिक्षिका व शिक्षक व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने व उत्स्फूर्तपणे राख्या बनवणे बनवल्या. उपक्रम क्रमांक 2. एक राखी पेड के नाम उपक्रम शाळेतील विद्यार्थिनी सर्व … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतिदिनानिमित्त ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात देशभक्ती आणि प्रबोधन पर कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे कार्यतत्पर प्राचार्य डॉ शिवाजी होडगे यांच्या हस्ते गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्याला पुष्पहार … Read more

निधन वार्ता : गोरखनाथ तुकाराम सावंत यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी : शिंदेवाडी (ता कागल ) येथील गोरखनाथ तुकाराम सावंत (वय ५८ ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.  त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , मुलगा व मूलगी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन उद्या रविवार (दि.१० ) रोज़ी शिंदेवाडी येथे आहे.

शिवराज विद्यालयाच्या विद्यार्थिनिनी पोलिसानां राख्या बांधून रक्षाबंधन सण केला साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ): बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. आज या सणाचे औचित्य साधून शिवराज विद्यालय मुरगूडच्या हरित सेनेच्या विद्यार्थिनींनी मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधनसणाचा सण उत्साहात साजरा केला . पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे अशक्य असते. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या … Read more

कागल येथील दुधगंगा नदीवरील पुलावर पडलेला खड्डा बुजवला

कागल (सलीम शेख ‌) : काही दिवसांपूर्वी गहिनीनाथ समाचार या वृत्तपत्रामध्ये ‘कागल येथील दुधगंगा नदीच्या पुलावर पडलेला खड्डा’ या शीर्षकाखाली एक बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने कार्यवाही केली आहे. दुधगंगा नदीवरील या पुलावर अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण … Read more

गोरंबे घाटात पेटत्या कंटेनरचा थरार, कागल निढोरी मार्गावरील घटनाआगीत  लाखोंचे नुकसान

कागल (विक्रांत कोरे): कागल – निढोरी राज्यमार्गावर गोरंबे ता.कागल हद्दीतील वाघजाई घाटात पेटत्या कंटेनरचा थरार पहायला मिळाला. आगीत कंटेनरचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोवा येथून पंजाबकडे कंटेनर निघाला होता.केमिकल वाहतुक करणारा दिल्ली हुबळी रोडलाईन्सचा कंटेनर क्रमांकआर.जे.१४  जी.क्यू ८४५०,हा बुधवार (दि.6) रोजी सकाळी 9.00 वाजता गोरंबे ता.कागल … Read more

उजना डेअरीला गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांची भेट.

कागल प्रतिनिधी सांगनी सुनेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर): उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लिमीटेड या प्रतिष्ठित डेअरीस गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीप्रसंगी अहमदपूरचे माजी सहकार राज्यमंत्री बाळासाहेब जाधव व अविनाश जाधव यांनी त्यांचा औपचारिक सत्कार केला. यावेळी नविद मुश्रीफ यांनी डेअरीच्या विविध यंत्रणा व कार्यपद्धतींची सविस्तर पाहणी केली. दूध … Read more

शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे मुरगूड

मुरगूड ( शशी दरेकर ): आजच्या युगात मानवाने प्रगतीच्या शिखरावर झेप घेतली असली, तरी पर्यावरणीय समतोल ढासळल्यामुळे संपूर्ण मानवजातीपुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, हवामानातील झपाट्याने होणारे बदल ही या संकटाची मुख्य कारणे ठरत आहेत. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या पार्श्वभूमीवर ‘वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन’ हे केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि नैतिक … Read more

लोकमान्य टिळकांनी प्रखर राष्ट्रवादाचा विचार दिला. प्राचार्य – डॉ.टी. एम. पाटील.

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रखर राष्ट्रवादाचा विचार दिला. शिक्षण आणि समाज यासाठी चतु:सूत्रीची संकल्पना मांडली. ती आजही प्रेरणादायी आहे.लोकांना संघटित करून त्यांच्यात स्वातंत्र्याची जागृती निर्माण केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखन साहित्यातून सामाजिक व्यथा मांडल्या. ते कुशल संघटक होते. त्यांनी गिरणी कामगार चळवळीला भक्कम आधार दिला. शाहिरीच्या … Read more

error: Content is protected !!