व्हनाळी – सागर लोहार : केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याने यंदाच्या 2022-23 गळीत हंगामासाठी ऊसाच्या एका टनाला 2921/- रूपये असा एकरकमी ऊस दर जाहिर केला. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली.
यंदा कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम असून गतवर्षी कारखान्याने 43 कोटी 45 लाखांची ऊस बीले तसेच 11 कोटी 17 लाखांची वाहतुक -तोडणी बीले (कमिशन सह) त्यात्या वेळी आदा केली आहेत. गाळप हंगामात 146 दिवस कारखाना चालवत असताना प्रतिदिन 1500 मेट्रीक टनाचे गाळप करीत 1 लाख 53 हजार 456 मेट्रीक टन ऊस गाळप केले आहे. त्यातून तयार होणा-या केमिकल फ्री गुळपावडर तसेच सल्फर लेस खांडसरी साखर ही उत्पादने आरोग्यदाई असल्यामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जागतीक बाजारपेठेत या उत्पादनानां मोठा वाव आहे.
गत साली सर्व शेतक-यांनी आमच्यावर विश्वास ठेवून ऊस पाठवला तसेच यंदाही आपला संपुर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन ही श्री घाटगे यांनी केले. यावेळी संचालक शिवशिंग घाटगे, विश्वास दिंर्डोले, धनाजी गोधडे, के.के.पाटील, मल्हारी पाटील, सुभाष करंजे, एम.बी.पाटील, तानाजी पाटील, आनंदा साठे, दिनकर पाटील, दत्तोपंत वालावलकर, राजू भराडे आदी उपस्थीत होते.