मुरगूड ( शशी दरेकर ) : कु. पवन दिपक साळुंखे सांगलीचा. “सांगली गुजराथी हायस्कूलमध्ये इयत्ता ८वी मध्ये शिकणारा विद्यार्थी .. अलिकडे घरच्या दारिद्रयामुळे आई – वडीलांच्या सोबत एका छोटयाशा भाडयाच्या खोलीत मुरगूडमध्ये रहायला आला आहे.
पवनचे वडील दिपक साळुंखे हे लोहार व इतर कामे करून संसाराचा गाडा चालवत आहेत. हा व्यवसाय सांभाळतानां दोन वेळ कसेतरी हाता-तोंडाची गाठ पडते.
पवन हुशार आहे. शिकायची जिद्द आहे. त्यामुळे मुरगूड विद्यालय मुरगूड मध्ये तो इयत्ता ८वीमध्ये शिक्षण घेत आहे .एका साध्या पिशवीत मोजकेच शैक्षणिक साहित्य घेऊन तो मुरगूड विद्यालयाकडे मार्गस्थ व्हायचा. त्याच्या ड्रेसची आबाळ पाहून काही युवक त्यांच्या मदतीसाठी धावून येऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
अनेकानां मदतीचा हात देणारे माजी उपनगराध्यक्ष श्री . दगडू शेणवी यानी शालेय गणवेश, ड्रेस, टीशर्ट, शॅक, व माजी नगरसेवक श्री. किरण गवाणकर , पत्रकार शशी दरेकर यानीं वह्या, व निवास कदम यांनी इतर शैक्षणिक साहित्य त्याला देऊन मदतीचा हात दिला. हे साहित्य स्विकारतानां पवनच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
या छोटेखानी कार्यक्रमावेळी माजी प्राचार्य व ज्येष्ठ साहित्यीक मा . श्री .जीवनराव साळोखे , माजी उपनगराध्यक्ष श्री . दगडू शेणवी , माजी नगरसेवक किरण गवाणकर , पत्रकार श्री . शशी दरेकर , सेवानिवृत्त पोलिस श्री .निवास कदम , श्री . महादेवराव साळोखे , श्री .आकाश रेंदाळे , सुशांत मांगोरे , सागर सापळे .आदी उपस्थित होते .