अमृताच्या स्वप्नाला सतेज उर्फ बंटी पाटील यांचे बळ; जागतिक स्पर्धेसाठी ५० हजारांची मदत

मुरगूड (शशी दरेकर) : जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे स्वप्न घेऊन अमेरिकेला जाणाऱ्या मुरगुडच्या अमृता पुजारीच्या पाठीशी माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्यांनी अमृताला ५० हजार रुपयांची बक्षीस रक्कम देऊन तिच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेला शुभेच्छा दिल्या.

Advertisements

    २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी अमृताची निवड झाल्याबद्दल दि. ६ सप्टेंबर रोजी बंटी पाटील यांनी तिचा सन्मान केला होता. यावेळी जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे बक्षीस त्यांनी तातडीने देत ‘बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले’ याची प्रचिती दिली.

Advertisements

    मंडलिक कुस्ती संकुलात झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक राजेंद्र साबळे व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव ताशिलदार यांच्या हस्ते मुरगुड नगरीचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके, जयसिंग भोसले, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे, नगरसेवक एस. व्ही. चौगुले, राजू कांबळे, अंगज मॅडम, शिंदे मॅडम, पत्रकार सुनील डेळेकर यांच्या उपस्थितीत अमृताकडे बक्षिसाची रक्कम सुपूर्द  करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक दादासो लवटे यांच्यासह NIS कुस्ती प्रशिक्षक दयानंद खतकर, महिला NIS कुस्ती प्रशिक्षक नंदिनी साळोखे आणि उपमहाराष्ट्र केसरी रोहन रंडे हे मान्यवर उपस्थित होते.

“बंटी पाटील यांची ही मदत अमृताला जागतिक स्तरावर कोल्हापूरचे नाव चमकविण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल,”असा विश्वास दादासो लवटे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!