मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील सर्वांच्या परिचित व विश्वसनीय संस्था म्हणून ओळखली जाणारी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगुड या संस्थेची मार्च २०२२ ते मार्च २०२३ ची शेवटची मीटिंग दिनांक ३१/३/२०२३ रोजी चेअरमन श्री किरण गवाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
३१ मार्च २०२२ अखेर ९१ लाख ११ हजार असणारी उलाढाल मार्च २०२३ अखेर १०८ कोटी ६५ लाख इतकी झाली असून मार्च २o२२ व मार्च २०२३ या कालावधीमध्ये अंदाजे १७ कोटी एवढी वाढ झाली आहे. तर यावर्षी ढोबळ नफा ६३ लाख ७५ हजार इतका झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर यांनी दिली. यावर्षी म्हणजेच ३१ मार्च २०२२-२३ मध्ये गुंतवणुकीमध्ये ७१ लाखाची वाढ होऊन गुंतवणूक ५ कोटी ९४ लाख इतकी झाली आहे. तर १ कोटी २२ लाखाची वाढ होऊन दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर १७कोटी ३३ लाख इतक्या ठेवी जमा झाल्या.
तसेच यावर्षी कर्जामध्ये १ कोटी ४८ लाखाची वाढ होऊन दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर १३ कोटी ३९ लाख रुपये इतके कर्ज वाटप झाले. ही संस्था दिनांक ३०/ १०/१९९९ ला स्थापन झालेली आहे. पतसंस्था ठेवीदारांसाठी नेहमी समाधानकारक निर्णय घेत आहे. त्यामुळे संस्थेचा यशाचा आलेख कायम चढता राहिला आहे संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक व तप्तर, विनम्र सेवक वर्ग यामुळे संस्थेच्या नावलौकीकात भर पडत आहे.
श्री व्यापार नागरी सहकारी पतसंस्थेची या सगळ्या कामकाजाची दखल घेऊन नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या सामाजिक संस्थेने नुकताच “आदर्श पतसंस्था ” पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. या पुरस्काराने संस्थेस प्रेरणा व प्रोत्साहन मिळत असून भविष्यात ठेवीदार, कर्जदार व सेवक वर्गासाठी हिताचे निर्णय घेऊ शिवाय विधायक कामामधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नक्कीच करू असा विश्वास संस्थेचे चेअरमन श्री किरण गवाणकर यांनी व्यक्त केला