गडहिंग्लज मध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप

गडहिंग्लज – धनंजय शेटके

Advertisements

पाच दिवस घरगुती पाहुणचार घेतलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला आज गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.आज सकाळ पासूनच बाप्पाच्या विसर्जनाची लगबग घरोघरी सुरू होती.या साठी नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केेली होती.शहरात २२ विविध ठिकाणी कुंडाची सोय करून नदी घाटावर गर्दी होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासनाने घेतली होती.

Advertisements

त्याच बरोबर पोलीस प्रशासनाने देखील कोणीही भाविक नदी घाटाकडे येणार नाहीत यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता यासाठी राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने दुपार नंतर भाविक बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी बाहेर पडले.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात आबालवृद्धांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.भाविकांनी देखील पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या बाप्पाचे विसर्जन कुंडात करत उस्फुर्त प्रतिसाद दिला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका व पोलीस उत्कृष्ट नियोजन केले होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!