
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे निसर्गाचा अदभूत चमत्कार पाहावयास मिळाला.येथील प्रशांत रंगराव मोरबाळे यांचा मुरगुड येथील भावेश्वरी चौक येथे गोठा आहे. त्या ठिकाणी त्यांनी अलिकडेच एक गाय विकत घेतली होती.
आज त्या गाईने चक्क दोन तोंडे व तीन डोळे असलेल्या वासराला जन्म दिला या वासराला तीन डोळे आणि दोन तोंडे असून संपूर्ण काळ्या रंगाचे हे वासरू धडधाकट आहे मात्र डॉक्टरांनी काळजी घेण्याची गरज आहे असे सांगितले आहे .प्रशांत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या वासराची योग्य काळजी घेत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुरगुडच्या कानाकोपऱ्यात ही बातमी पोहोचल्यानंतर या वासरास पाहण्यासाठी मुरगूडकर व परिसरातील नागरीकानीं या वासराला पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Very interesting topic, thankyou for putting up.