कागलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात मंत्री श्री.मुश्रीफ यांना मानपत्र
कागल, दि. ५ : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेला नेहमीच पाठबळ दिले आहे. गोरगरीब जनतेचे ते फकीरा आहेत, असे गौरवोद्गार डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी काढले.
कागलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, मातंग समाज मेळावा आणि मंत्री श्री. मुश्रीफ यांना मानपत्र देऊन सत्कार अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. कागलच्या शाहू मेमोरियल हॉलमध्ये हा कार्यकम झाला.
प्रा. कांबळे पुढे म्हणाले, अंधश्रध्दा, रूढी आणि परंपरा याच्यात गुरफटल्यानं मातंग समाज आजही उपेक्षित राहिलाय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेतले तर समाज प्रगतीच्या मार्गावर जाईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यनिर्मिती करून जगाचं लक्ष वेधलं. ग्रंथालयांची मागणी करून अनावश्यक खर्च टाळा. हा पैसा मुलांच्यावर खर्च करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आवाहन त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना मंत्री श्री. म्हणाले, मातंग समाजाच्या सर्वागिन विकासाकरिता आपण प्रयत्न करत आलोय. त्यांना आपण कधीही अंतर देणार नाही. नेहमीच हिमालयाप्रमाणं समाजाच्या पाठिशी राहू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान आहे. मातंग समाजाचा विकास आणि उन्नतीकरीता आपण नेहमीच प्रयत्न करत आलोय. समाज मंदीर बांधण्याबरोबर समाजात ग्रंथालयं सुरू केल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.अण्णाभाऊना भारतरत्न द्या……….
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अवघे दीड दिवस शाळेमध्ये गेले. त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. आपणही या मागणीशी सहमत असून त्यासाठी पाठपुरावा करु.
अण्णाभाऊना भारतरत्न द्या……….
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अवघे दीड दिवस शाळेमध्ये गेले. त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. आपणही या मागणीशी सहमत असून त्यासाठी पाठपुरावा करु.
मातंग समाजाच्या मेळाव्यात समाज बांधवांची उपस्थिती
जिल्हा परिषदेचे वित्त आणि लेखा अधिकारी अतुल आकुर्डे, नायब तहसिलदार पूजा अवघडे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या महिला आणि युवकांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
माजी आमदार राजीव आवळे, दलितमित्र बळवंतराव माने, संजय हेगडे, मोहन आवळे, सर्जेराव अवघडे यांनी मनोगते झाली. कार्यक्रमास भैय्या माने, प्रकाश गाडेकर, अजितराव कांबळे, भिवाजी आकुर्डे, प्रकाश तिराळे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.