कोल्हापूर, दि. 24 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून दिनांक 26 जुलै रोजी माजी सैनिकांनी वृक्षारोपण करावयाचे आहे. गावामध्ये 50 पेक्षा कमी व 50 पेक्षा जास्त माजी सैनिक समुहास अशा गावातील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे फोटो व त्याबाबतचा अहवाल सरपंचांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.

Advertisements

या कार्यक्रमाकरिता अनुक्रमे प्रथम समुहाला पहिल्या क्रमांकास 10 हजार रुपये व द्वितीय क्रमांकास 5हजार रुपये आणि दुसऱ्या समुहास प्रथम क्रमांकास 20 हजार रुपये व द्वितीय क्रमांकास 15हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. माने यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी 0231-2665812 या क्रमांकवर संपर्क साधावा.

Advertisements
AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!