कागल तालुक्यातील दुधगंगेत सापडल्या चार मानवी कवटया

तालुक्यासह सीमाभागात एकच खळबळ

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली येथील नदी किनारा जवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटया आढळल्या. यामुळे तालुक्यात भीतीदायक खळबळ उडाली आहे. कागल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या कवट्या ताब्यात घेतल्या.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक
पोहण्यासाठी, जनावरे धुण्यसाठी जातात. आज नियमा प्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्याने कवटी दिसून आली. याबाबत तात्काळ त्यांनी पोलीस पाटील उध्दव पोतदार यांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी कागल पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या कवट्या ताब्यात घेतल्या. सदर चार मानवी कवटी एकाच परिसरात सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे. या व्यक्ती कोण ? नेमका हा प्रकार कधी घडला ? उर्वरित देह कुठे टाकला ? यांची उत्तरे तपासाअंतीच समोर येणार आहेत.

Advertisements

दरम्यान, या भागात अघोरी विदया करणारे काही भोंदु असल्याने त्यांनी अघोरी प्रकारासाठी या कवट्या वापरलेल्या आहेत का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!